दत्तनगरच्या महिलांनी केले धार्मिक पर्यटन
दत्तनगर खंडाळी येथील 85 महिलांनी राज्य परिवहन महामंडळाच्या श्रावण महिन्यातील विशेष बस सेवेचा लाभ घेऊन गाणगापूर येथे श्री दत्त महाराजांचे अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे तसेचसोलापूर येथे सिद्धरामेश्वराचे दर्शन घेतले या दर्शनयात्रेचे नियोजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माळशिरस तालुका सरचिटणीस विनोद थिटे यांच्या माध्यमातून करण्यात आले. या धार्मिक वारीमध्ये दत्तनगरच्या 85 महिलांनी एसटीच्या दोन लाल परीतुन सहभाग नोंदवला सकाळी सहा वाजता चालू झालेला प्रवास संध्याकाळी एक वाजता संपला परंतु महिलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह मात्र ओसांडून वाहत होता.यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने चालक म्हणून आबा गोसावी व खंडोबा गायकवाड यांनी सर्व महिलांना सुरक्षितरित्या प्रवास घडवला. या दर्शनयात्रेत विजया गायकवाड, कोमल वाघमारे ,आशा पवार, तृप्ती जगताप अमृता धनवडे,सुप्रिया गायकवाड ,सुजाता पवार ,अंजली पवार ,शारदा कांबळे, संगीता वारुळे, नंदा हिप्परकर,महानंदा जाधव, छाया काटकर, स्वाती इंगळे, जयश्री जाधव व सुमन पवार वनिता खंडागळे यांच्यासह अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.हे धार्मिक पर्यटन घडवण्यासाठी राज्य परिवहन अकलूज आगाराचे आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदेसाहेब ,वाहतूक निरीक्षक सोनवलकरसाहेब,वाहतूक नियंत्रक रंदवे साहेब ,राजू गोसावी साहेब व मालवाहतूक नियंत्रक लंगोटे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले सर्व महिलांच्या वतीने यात्रा समारोपाच्या वेळी चालकांचा सत्कार करण्यात आला.






