कोणत्याही परिस्थितीत बंद दारा आड चर्चेला जाणार नाही-योगेश केदार
.मुंबई (प्रतिनिधी )मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळावे. या मागणीसाठी सध्या मुंबई येथील आझाद मैदान येथे उपोषण सुरु आहे.या पार्श्वभूमीवर बोलताना या वनवास यात्रे चे आयोजक योगेश केदार यांनी सांगितले की,या नेत्यांमध्ये जर खरोखर मराठ्याचं रक्त असतं, तर ते चर्चेला आझाद मैदानावर आले असते. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मराठा म्हणवणाऱ्या मंत्र्यांमध्ये मराठ्यांच रक्त आहे की नाही याची शाश्वती देता येत नाही. जे रक्त मराठ्यांकडे वळत नाही ते रक्त मराठ्यांचं असूच शकत नाही. छावाचे अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या वाक्यात आज सरकार च्या प्रतिनिधींना उत्तर दिले. आम्ही कोणत्याही परिस्थितीत बंद दारा आड चर्चेला जाणार नाही.*येत्या 17 तारखेला पावसाळी अधिवेशन काळात हजारों च्या संख्येने मराठे मुंबई मध्ये दाखल होणार आहेत. याची भीती सरकार ने घेतली आहे. आता हे ओबीसी आरक्षण मागणारे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न सध्याचे सरकार करत आहे.असेही त्यांनी आवर्जून सांगितले







