दोन कोटींपेक्षा जास्त किमतीच्या गाडीत बसताना भिजलेले पवार साहेब टिव्ही वर दाखवले जातील… पण आझाद मैदानावर गेले अनेक दिवसांपासून दररोज भिजणारे विस्थापित मराठे दाखवले जाणार नाहीत.-योगेश केदार.
मुंबई (प्रतिनिधी )मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी 6मे रोजी तुळजापूर येथून मराठा वनवास यात्रा निघून तब्बल 500किलोमीटर पायी चालत 43डिग्री तापमान असताना 6जून रोजी मुंबई येथे पोहचली आहेसध्या आझाद मैदान येथे उपोषण सुरु आहे. परंतु सध्या पावसाळ्या चे दिवस असल्याने, तुफान पाऊस पडत आहे.उपोषणास बसलेले बांधव भर पावसात भिजत आहेत.पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याची दखल कोणत्याही मीडिया ने घेतली नाही.यासंदर्भात बोलताना या यात्रेचे संयोजक योगेश केदार म्हणाले की,दोन कोटींपेक्षा जास्त किमतीच्या गाडीत बसताना भिजलेले पवार साहेब टिव्ही वर दाखवले जातील… पण आझाद मैदानावर गेले अनेक दिवसांपासून दररोज भिजणारे विस्थापित मराठे दाखवले जाणार नाहीत. का? तर आम्ही ओबीसी मधून आरक्षण मागत आहोत. आमच्या समाजाच्या शेकडो पिढ्यांचे कल्याण ज्या ओबीसी आरक्षणातून होणार आहे. ती मागणी लोकांपर्यंत पोचू दिली जात नाही. सरकार स्तरावर दाबले जात आहे, मीडिया वाले दाबत आहेत, पोलीस प्रशासन दाबत आहे, सोशल मीडियावर देखील मोजक्याच स्तरावर व्हायरल केले जात आहे. हेच मोठे दुःख आहे. अशी खंत योगेश केदार यांनी व्यक्त केली.







