सौ. भागाबाई शिवाजी गाडे यांचे निधन
अकलूज (प्रतिनिधी )संग्रामनगर, अकलूज येथील सौ. भागाबाई शिवाजी गाडे (वय 75वर्षे )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात 5मुले, सुना,7नातवंडे,3नाती असा परिवार आहे.सामाजिक कार्यकर्ते विलास, किसन, विष्णू, बाळासाहेब, पंकज यांच्या त्या मातोश्री होत्या. संग्रामनगर ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य पंकज गाडे यांच्या मातोश्री तर माजी उपसरपंच उमाकांत गाडे यांच्या त्या आजी होत्या.त्यांचेवर अकलूज येथील अकलाई स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या तिसऱ्याचा (सावडन्याचा )विधी 11जुलै रोजी सकाळी 7-30वाजता होणार आहे.त्या अत्यंत मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.






