मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरु असलेल्या मराठा वनवास यात्रेला छावा ब्रिगेड चे अध्यक्ष व नगर जिल्ह्याचे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विश्वनाथ वाघ यांची सदिच्छा भेट
मुंबई (प्रतिनिधी )मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरु असलेल्या मराठा वनवास यात्रेला छावा ब्रिगेड चे अध्यक्ष व नगर जिल्ह्याचे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विश्वनाथ वाघ साहेब,. तसेच मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी चळवळीचे नेते यादव यांनी मराठा वनवास यात्रेच्या आंदोलन स्थळी भेट दिली. जालना जिल्ह्यातील समन्वयक सचिन पाटील देखील उपस्थित झाले होते. गेले दोन महिन्यापेक्षा जास्त काळापासून घर दार सोडून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण कसे देता येईल? यावर जनजागृती करण्याचे काम चालू आहे.. आझाद मैदानावर बसून देखील आता महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेला. आधी भर उन्हाळ्यात अनवाणी वाटचाल केली. आता इथे पावसात आम्ही जो संघर्ष करत आहोत त्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांचे लक्ष लागून आहे असे त्यांनी सांगितले. तुम्ही जो प्रामाणिकपणे लढा उभा करत आहात त्याला आमचा पाठिंबा आहे व पुढे आम्ही ताकदीने आझाद मैदानात सहभागी होऊ असा शब्द दिला. आज संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम मराठा संघटना तसेच सर्वसामान्य समाजाला एकच विषयावर आणणे आमचे उद्दिष्ट आहे. ते म्हणजे ओबीसी मधूनच आरक्षण ही एकमेव मागणी समाजाची असावी. तरच यश मिळेल. आणि मोठ्या प्रमाणात यशही मिळत आहे. याचे समाधान.
योगेश केदार
9823620666
मराठा वनवास यात्राआझाद मैदानदिवस 62 वा.







