गणपती फार्मसी महाविद्यालयातील डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षेत घवघवीत यश.
अकोले खुर्द तालुका माढा येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या उन्हाळी परीक्षा 2023 चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये श्री गणपती फार्मसीतील डी फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याची माहिती प्राचार्य डॉ.रूपाली बेंदगुडे यांनी दिली. डी फार्मसी प्रथम वर्गामध्ये अनुक्रमे प्रथम घाडगे प्रियंका (73.90%), द्वितीय थोरात सायली (73%), तृतीय राऊत रेखा (72%) व द्वितीय वर्गामध्ये अनुक्रमे पाटील मोहिनी प्रथम (79.90%), द्वितीय भगत दिपाली (79.30%), तृतीय कोकरे ऋतुजा (77%) क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे सचिव डॉ. रवींद्र बेंदगुडे, अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. केतकी पाटील प्रा. धनश्री कारंडे प्रा. कोमल यादव प्रा. मोनिका माळी प्रा. रूपाली राऊत प्रा. प्राची पुराणिक यांचे मार्गदर्शन लाभले.







