मराठा समाजाच्या वतीने आझाद मैदानावर ओबीसी आरक्षण दिंडी….
मुंबई (प्रतिनिधी )आषाढी एकादशी निमित्ताने आझाद मैदानावर वारकरी परंपरेनुसार दिंडी काढण्यात आली. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेश भूषेत असलेले युवक सहभागी झाले. श्री संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत आपले वारकरी बांधव उपस्थित होते. टाळ मृदंगाच्या गजरात तिथे दिंडीचे आयोजन करण्यात आले. तसेच उपस्थित समाज बांधवांच्या समोर मराठ्यांना ओबीसी आरक्षण कसे मिळेल? यावर भाषण देखील झाले.. एक दिवस मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण मागणीला व्यापक स्वरूप येईल. मराठ्यांचा वणवा पेटेल आणि ओबीसी आरक्षण मिळवून मराठ्यांचा आरक्षण बाबतीतला वनवास मिटेल. असा दुर्दम्य आशावाद आमच्यात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर येऊन आमचे प्रश्न सोडवावेत. तरच तुम्हाला पांडुरंगाचे आशीर्वाद प्राप्त होतील. अन्यथा नाही. ही भावना योगेश केदार यांनी व्यक्त केली.यावेळी सुनील नागणे यांनी देखील विचार व्यक्त केले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.. या तुकाराम महाराजांचा अभंगाच्या दाखला देऊन ते म्हणाले की मुख्यमंत्री महोदय रांजल्या गांजल्यांचा प्रश्न सोडवा. मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवा तिथेच तुम्हाला देव भेटेल अण्यथा नाही. यावेळी शिवसेना नेते व पुणे जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर म्हणाले की भर उन्हात 500 किलोमीटर चालत आलेले बांधव आज पावसात भिजत असले तरी आझाद मैदानावर ठाण मांडून बसले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षण मागणीकडे तत्काळ लक्ष दिले पाहिजे. डिंभे आणि कल्मोडी धरणातील पाण्या संदर्भात आंबेगाव परिसरातील बांधवांच्या मागण्यांचा देखील सरकार ने गांभीर्याने विचार न्याय दिला पाहिजे. यावेळी मराठा वनवास यात्रा चे प्रतापसिंह कांचन पाटील जी, पुणे जिल्हापरिषद सदस्य देविदास दरेकर जी, महेश केदार, रणजित चव्हाण, अण्णा शिंदे, विशाल सावंत तसेच तमाम महाराष्ट्रातून आलेले बांधव उपस्थित होते.







