अकलूज येथील अकलाई आयसीयू अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील बिलात 35लाख 97हजार रुपये ची अफरातफर केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील अकलाई आय सी यु अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या बिलामध्ये तीस लाख 97 हजार 302 रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी भावना कैलासपती दुबे यांनी (रा.मुलाणी वस्ती, माळेवाडी )केल्याप्रकरणी डॉक्टर भूषण भारत (वय 36 वर्ष )व्यवसाय वैद्यकीय राहणार गांधी चौक अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी अकलूज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आरोपी ने अकलाई हॉस्पीटलमध्ये अकौंट विभागामध्ये काम पाहत असताना रुग्णांकडून हॉस्पीटलचे येणारे बिल हे हॉस्पीटल चे बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा अकलुज अकौंट नंबर 60352702161 व सीएसबी बॅक शाखा अकलुज अकौंट नंबर 050904364496195001 वर जमा करुन घेणे आवश्यक असताना तिने काहीएक कल्पना न देता ब-याच रुग्णांची बिले त्यांचे वैयक्तिक बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा अकलुज खाते नंबर 25051796936 वर घेतली असल्याचे आढळून आले.
तसेच रोख स्वरुपात आलेली बिले ही हॉस्पीटलचे खात्यामध्ये जमा न करता ते तिने स्वतःकडे ठेवली असून स्वतःच्या खात्यावर तसेच रोख स्वरुपात रकमा स्विकारुन हॉस्पीटलच्या नावाच्या रिसीप्ट दिलेल्या आहेत.
फिर्यादीने त्यांचे रेकॉर्ड नुसार खात्री केली असता. आरोपी ने दि 09/07/ 2021 ते दिनांक 28/06/2023 या कालावधीत ऑनलाईन स्वरुपातील 20,97,302/(वीस लाख सत्यानव हजार तिनशे दोन) रुपये हॉस्पीटलचे खात्यावर जमा करुन न घेता स्वतःचे अकौंटला जमा करुन घेतले आहेत.व रोख स्वरुपातील अंदाजे 15 लाख रुपये हे त्यांनी हॉस्पीटलचे खात्यावर जमा न करता स्वतःसाठी वापरुन एकुण 35,97,302/(पस्तीस लाख सत्यानव हजार तिनशे दोन) रुपयाचा अपहार केला आहे.
म्हणून मा.पो नि सो यांचे आदेशान्वये अकलूज पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ४६७/ 2023 भारतीय दंड विधान कलम 408 प्रमाणे29/06/2023 रोजी गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि/जाधव हे करीत आहेत.






