मध्यप्रदेश येथील बागली तालुका विधानसभा मतदार संघासाठी निलेश ननवरे यांची अल्पकालीन विस्तारक म्हणून नियुक्ती
अकलूज (प्रतिनिधी )27 जुन 2023 रोजी मध्यप्रदेश भोपाळ येथे झालेल्या भारतीय जनता पार्टी चे ‘ *मेरा बुथ सबसे मजबुत*’ या संवाद कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ,भा.ज.पा.चे राष्टीय अध्याक्ष जे.पी. नडडा ,मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण व पक्षाचे वरिष्ठा नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता प्रशिक्षण व विस्तारक अभियान पार पडले. या मध्ये माळशिरस तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे विस्तारक अकलुज येथील निलेश सुर्यकांत ननवरे हे सहभागी झाले होते. निलेश ननवरे हे व्यवसायाने पशु वैदयकीय डॉक्टर असुन त्यांनी संघ परिवारातील महत्वाच्या विविध जबाबदारी पार पाडलेल्या आहेत. सघ्या ते भा.ज.पा माळशिरस तालुका विस्तारक असुन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुक पुर्व तयारीसाठी दि.24 जुन 2023 पासुन मध्यप्रदेश येथील बागली तालुका विधानसभा हा अनुसुचीत जाती जमाती आदीवासी मतदारसंघ असुन सध्या निलेश ननवरे हे तेथे अल्पकालीन विस्तारक म्हणुन कार्य करीत आहेत.






