बागेवाडी – हंसराज नगर – चव्हाण वस्ती ग्रामीण रस्ता क्र.१५ ची चौकशी करुन संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी – रणजित गायकवाड
अकलूज (प्रतिनिधी) – माळशिरस तालुक्यातील बागेचीवाडी -हंसराजनगर ते चव्हाण वस्ती चा ग्रामीण रस्ता क्र.१५ साखळी क्रमांक 0/00 ते 2/00 या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम दि.07/12/2022 रोजी मंजूर झालेले असून,त्यामध्ये साफसफाई करणे,मुरमीकरण करणे,टॅकॉट मारणे कारपेट करणे,सिलकोट करणे,साइटपट्टी भरणे अशा स्वरूपाची कामे मंजूर झालेली असताना ठेकेदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने अतिशय निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून 379 मीटर काम करण्याऐवजी फक्त 300 मीटर काम केले आहे.त्याची रुंदी कुठच बसत नाही. साईट पट्टी तर कुठच दिसत नाही. बाहेरून मुरूम आणून टाकणं गरजेचं असताना तिथंच खड्डे पाडून अतिशय हलक्या प्रतीचा मुरूम टाकला आहे. तोही पहिल्याच पावसाने वाहून गेला आहे. ठेकेदाराने केलेल्या संपूर्ण रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे व ते जास्त दिवस टिकणार नाही.
सदर रस्ता मौजे बागेवाडी येथील बागेवाडी हंसराज नगर चव्हाण वस्ती चा ग्रामीण रस्ता क्र.१५ साखळी क्र.0/00 ते 2/00 चे झालेल्या डांबरीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष स्थळपहाणी करून कामाचा दर्जा तपासून निकृष्ट दर्जाच्या कामाची दुरूस्ती करून. सदर ठेकेदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.अशी मागणी बागेवाडी येथील रणजित गायकवाड यांनी केली आहे.जर तात्काळ कारवाई झाली नाही तर जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.






