सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे अल्पशा आजाराने निधन. आमदार राम सातपुते यांना मातृशोक.
अकलूज (प्रतिनिधी )सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने सोमवार दि. २६ जून २०२३ रोजी सायंकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून,तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या त्या मातोश्री होत्या.जिजाबाई व विठ्ठल सातपुते यांनी प्रतिकूल परिस्थितीत संसार करून आपल्या मुलांना चांगले संस्कार व उच्च शिक्षण दिलेले आहे. दोन-तीन महिन्यापासून दवाखान्यांमध्ये औषध उपचार सुरू होते. माळशिरस तालुक्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखींचे आगमन होऊन पालखी तालुक्याच्या सरहद्दीवरून पंढरपूरकडे जात असताना सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला.जिजाबाई यांना सौभाग्य मरण आलेले आहे. त्यांच्यावर डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड येथे मंगळवार दि. २७ जून २०२३ रोजी सकाळी ०९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्या अत्यंत मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.







