माळशिरस तालुक्यातील पालखी सोहळ्यातील बायो वेस्ट बायो क्लीन कडे सुपूर्द
अकलूज (प्रतिनिधी )श्री संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज पालखी सोहळा माळशिरस तालुक्यात आल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी बायो -वेस्ट मोठया प्रमाणावर जमा झाला होता.सोलापूर येथील बायोक्लिन चे अनिल शिंदे व महावीर बनसोडे हे नियमित पणे माळशिरस तालुक्यातील बायो वेस्ट घेऊन जातात.
वारी च्या काळात आपले नियमित काम सांभाळून इतर जवळपास 50ते 60किलो बायो वेस्ट गोळा करून कंपनी कडे सुपूर्द केला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.






