• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

ओ.सि.डी. आणि होमिओपॅथी….डॉ.पल्लवी कदम…

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 25, 2023
in महाराष्ट्र
0
ओ.सि.डी. आणि होमिओपॅथी….डॉ.पल्लवी कदम…
0
SHARES
163
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ओ.सि.डी. आणि होमिओपॅथी….डॉ.पल्लवी कदम… ओबेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजेच अत्याग्रही विकार हा सर्वसामान्य पणे आढळणारा मानसिक विकार आहे. पण माहिती च्या अभावामुळे अनेकजण यावर उपचार घेत नाहीत. ऑब्सेशन म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे विचार आणि कम्पलशन म्हणजे पुन्हा पुन्हा होणारी कृती. या विकारामध्ये व्यक्ति काहीही कारण नसतांना प्रमाणाबाहेर आणि बळजबरी एखादी कृती करत असते किंवा एखाद्या गोष्टीचा विचार करत असते. हा आजार हळू हळू वाढून गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. स्त्रिया व पुरुष दोघांमध्ये हा विकार समप्रमाणात आढळतो. तसेच लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती पर्यंत कोणालाही हा विकार होऊ शकतो. सहसा तरुणपणामध्ये याची सुरुवात होते. कारणे – मेंदूतील काही रासायनिक बदल यासाठी कारणीभूत ठरतात. काही रुग्णांच्या बाबतीत आनुवंशिकताही असते. तसेच जास्त ताण तणाव सुद्धा या आजारासाठी कारणीभूत ठरू शकतो. सिरोटोनाइन नामक रसायनाचे प्रमाण कमी झाल्याने स्वतः ची कृती निर्थक आणि त्रासदायक असून सुद्धा रूग्णांना ती थांबवता येत नाही. मानसशास्त्रा प्रमाणे ओ सि डी हे सुप्त मनात दबलेल्या असुरक्षिततेचे बाह्य रूपांतरण आहे. मुख्य लक्षणे- वारंवार हात धुणे , वारंवार आंघोळ करणे, वस्तू ठराविक क्रमानेच रचने , दरवाजे/कुलूप सारखे तपासणे, एखाद्या वस्तूला पुन्हा पुन्हा स्पर्श करणे, ठराविक अंक पुन्हा पुन्हा मोजणे, तसेच जंतू संसर्ग होण्याची भीती वाटणे, स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचे विचार येणे, सतत लैंगिक विचार येणे, स्वतःला एखादा जीव घेणा आजार होण्याची भीती वाटणे, सतत एकाच गोष्टीची चिंता करत राहणे.देवी देवतां बद्दल नको ते घाणेरडे विचार येणे. सतत अश्लील शिव्या/किळसवाणे विचार येणे ,गर्दीच्या ठिकाणी जाण्याची भीती वाटणे,टीव्ही, न्यूज पेपर मधील वाईट घडलेल्या घटना स्वतः सोबत होतील याची चिंता करीत राहणे, अचानकपणे किंवा वारंवार शारीरिक हालचाली करणे. जसे खांदे उडविणे, डोळे मिचकावणे , घसा खाकरणे, आवाजात चढउतार करणे. सतत निराश राहणे, झोप कमी लागणे.या विकारामुळे संबंधित व्यक्तीचे जिवन विस्कळित होते तसेच कौटुंबिक स्तरावर ही याचा परिणाम होतो. स्वच्छतेचा ओ सि डी असणारे लोक हात इतके स्वच्छ करतात की हातांची त्वचा सोलून निघते, काही लोक आठ आठ तास आंघोळ करण्यात घालवतात ,घराची पुन्हा पुन्हा साफसफाई करतात. भीती तणाव चीडचीड दुःख व निराशा यामुळे मानसिक स्थिती बिघडते. ह्या सवयी म्हणजे एक प्रकारचा विकार आहे, हे बर्‍याच लोकांना माहीत नसते त्यामुळे वेळे वर उपचार घेतले जात नाहीत आणि हा आजार वाढत जातो. उपचार दृष्टीने बघता हा थोडा चिकट स्वरूपाचा आजार आहे पण वेळेवर समुपदेशन आणि औषधोपचार घेणे महत्त्वाचे आहे. होमिओपॅथी उपचार पद्धतीने हा आजार नियंत्रणात आणला जाऊ शकतो. होमिओपॅथी उपचार पद्धती मध्ये रुग्णाची शारीरिक तसेच मानसिक स्तरावर तपासणी करून उपचार करण्यात येतात. होमिओपॅथी उपचार प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्रपणे करण्यात येतात तसेच जरी त्यातील औषधी घटक हे समान असले तरी त्याचा प्रत्येक व्यक्तीवर होणारा परिणाम देखील निरनिराळा असू शकतो. होमिओपॅथी उपचारांमध्ये फक्त विकाराची लक्षणेच तपासली जात नाहीत तर यासाठी रुग्णाची शारीरिक स्थिती,स्वभाव,व्यक्तीमत्व व इतर अनुवंशिक घटक यांचा देखील अभ्यास करण्यात येतो. या औषधांची सवय लागत नाही आणि हे उपचार पूर्णतः सुरक्षित आहेत. होमिओपॅथी मधील अनेक औषधांचा उपयोग ओ.सि.डी.साठी करता येतो.जसे की- 1) आर्सेनिक अल्बम- आर्सेनिकम अल्बम ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरच्या रूग्णांसाठी खूप उपयुक्त आहे. ज्यांना सतत मृत्यूचे विचार येतात आणि त्यामुळे ते औषध घेत नाहीत, कारण त्यांना वाटते की त्यांचा मृत्यू अगदी जवळ आला आहे आणि या टप्प्यावर कोणतेही औषध घेण्याचा काही उपयोग नाही. अशा रुग्णांना त्यांच्या सभोवतालच्या लोकांची गरज असते आणि ते एकटे राहू शकत नाहीत कारण त्यांना एकटे असताना वाईट वाटते.अशावेळी आर्सेनिक अल्बम हे होमिओपॅथिक औषध चांगले काम करते.2)अर्जेंटम नायट्रिकम:आर्जेन्टम नायट्रिकम हे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी सर्वोत्तम होमिओपॅथिक औषध आहे .ज्यांना सतत आवेगपूर्ण विचार येतात. या आवेगपूर्ण विचारांमध्ये वेगवेगळी लक्षणे असू शकतात , जसे की ट्रेनमध्ये प्रवास करताना खिडकीतून बाहेर उडी मारण्याचा सततचा आवेगपूर्ण विचार , नदीवरील पूल ओलांडताना सतत नदीत उडी मारण्याचा विचार येतो ,किंवा उंच इमारतींवर उभे असताना खाली उडी मारण्याचा भयानक विचार येतो.याचा परिणाम अशा आवेगपूर्ण विचारांपासून मुक्त होण्यासाठी शरीरातील सर्व शक्ती नष्ट होईपर्यंत व्यक्ती चालत राहते.3) नॅट्रम मुरियाटिकम – ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरच्या रूग्णांसाठी नॅट्रम मुरियाटिकम हे होमिओपॅथिक औषध वरदान आहे. ज्यांना चोर वार करू शकतात अशी भीती असते, म्हणुन ते दरवाजाचे कुलूप वारंवार तपासू शकतात. हा ध्यास इतका कायम असतो की रुग्णाला घरात चोरांची स्वप्नेही पडतात आणि पुन्हा पुन्हा दारे तपासण्यासाठी जागे होतात.4) सिलिसिया – सिलिसिया हे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरच्या रूग्णांसाठी चांगले होमिओपॅथिक औषध आहे. ज्यांना पिनचा (सुई) सतत विचार होतो आणि पिनची / सुईची भीती वाटते, पिन शोधतात, गोळा करतात आणि मोजतात.अशी लक्षणे असणारे रुग्ण या औषधाचा वापर केल्याने बरे होतात.5)कॅल्केरिया कार्बोनिका – कॅल्केरिया कार्बोनिका हे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरच्या रूग्णांसाठी वरदान ठरलेले औषध आहे. जे मानसिकरित्या थकलेले असतात आणि सतत वेडे किंवा वेडे होण्याचा विचार करतात. वेडे होण्याचा हा विचार रुग्णाच्या मनात रात्रंदिवस वावरत असतो आणि तो झोपेतही तो बाजूला ठेवू शकत नाही. वेडे होण्याच्या या भीतीमुळे मोठा त्रास होतो आणि त्यावर मात करण्यासाठी, रुग्ण सर्व प्रलंबित काम बाजूला ठेवतो आणि नकोत्या गोष्टीत स्वतः ला व्यस्त ठेवतो. अशावेळी या होमिओपॅथिक औषधाचा वापर करावा.या बरोबरच बेलाडोना, स्ट्रामोनिअम,सल्फर,नक्स ओमिका,हाओसायमस ,लायकोपोडीअम इ. होमिओपॅथिक औषधे तज्ञ अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत…

. डॉ. पल्लवी कदम ( एम.डी.होमिओपॅथी )… Kadampallavi9488@gmail.com

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
अकलूज येथे पांचाळ सोनार समाजाच्या वतीने सामुदायिक व्रतबंध समारंभाचे १० मे रोजी आयोजन

अकलूज येथे पांचाळ सोनार समाजाच्या वतीने सामुदायिक व्रतबंध समारंभाचे १० मे रोजी आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In