*अकलूज येथे पांचाळ सोनार समाजाच्या वतीने सामुदायिक व्रतबंध समारंभाचे १० मे रोजी आयोजन*
अकलूज (केदार लोहकरे यांजकडून)अकलूज येथील पांचाळ सोनार समाज संघटनेच्या वतीने कांतीलाल सांस्कृतिक भवन येथे बुधवार दि. १० मे रोजी सामुदायिक व्रतबंध (मुंजी) समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी प्रत्येक बटूस ६ हजार रुपये व्रतबंध शुल्क ठेवण्यात आले आहे.व्रतबंध सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक बटूस याज्ञिकेच्या पूजा साहित्यासह सोवळे,उपरणे व पंचा,फुलाच्या मोत्याच्या मुंडावळ्या,फुलांचा हार,ताम्हाण,संध्याची पळी, पंचपात्र,संध्याचे पुस्तक आदी साहित्य विनामूल्य दिले जाणार आहे असून,मातृभोजन व्यवस्था व मिरवणूक काढण्यात येणार आहे.अशी माहिती अकलूज पांचाळ सोनार समाज संघटनेचे अध्यक्ष राजीव लोहकरे उपाध्यक्ष सभाष पोतदार दिली आहे. या सामुदायिक व्रतबंध कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर खजिनदार हर्षद लोहकरे मो.न.(८२७५२०२४५६),सचिव प्रकाश कामेगावकर (मो.नं.८२६१८१६१४२),कार्याध्यक्ष बालाजी दीक्षित (मो.न.९९७५३१५३२६), संजय पोतदार (मो.नं ९८६००४३६७६ ) यांच्या संपर्क साधून आपल्या बटूच्या नाव नोंदणी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सदस्य अनिल पोतदार,बाळासाहेब वेदपाठक, अरुण क्षीरसागर,रंगनाथ पोतदार,अमित लोहकरे,रवींद्र भास्करे,सोमनाथ जडे,प्रशांत भास्करे,सागर महामुनी,नागेश वेदपाठक,निरंजन पंडित,आकाश तुळजापूरकर,अनुराधा लोहकरे, स्नेहल भास्करे,प्रशाली लोहकरे, कोमल महामुनी,दिपाली पोतदार, नम्रता वेदपाठक,मुग्धा पोतदार, उर्मिला पोतदार,शुभांगी पोतदार, धनश्री लोहकरे,आरती जडे, माधवी कामेगावकर,दिपाली पंडित,राजश्री महामुनी,भक्ती महामुनी,योगीता जड़े आदी उपस्थित होते.
चौकट
पांचाळ सोनार समाज संघटनेच्या वतीने दर तीन वर्षांतून एकदा सामुदायिक व्रतबंध समारंभाचे आयोजन करण्यात येते.आता पर्यंत २०० मुलांच्या व्रतबंधाचे कार्यक्रम केलेला आहे.तसेच वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.महिला संघटनेच्या वतीने दर वर्षी श्रावण महिन्यात हळदी कुंकू समारंभ, श्रावण शुक्रवारी मंगळागौरीची कार्यक्रम, नागपंचमी सणानिमित्त पारंपारिक खेळ अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असते.पांचाळ समाज संघटनेचा पुढील संकल्पना अकलूज गावात नरहरी महाराजांच्या मंदिरासाठी जागा घेऊन एक प्रशस्त मंदिर करण्यात येणार आहे.
*राजीव लोहकरे*अध्यक्ष,अकलूज पांचाळ सोनार समाज संघटना अकलूज






