होमिओपॅथी ही लोकाश्रयावर टिकून राजाश्रयासाठी 2013 प्रमाणे लढा उभारण्याची गरज… महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.अरूण भस्मे..
मिरा भाईंदर : दि.22 एप्रिल 2023 रोजी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर डॉ.राजेश पालांडे यांच्या मिरा भाईंदर, मुंबई येथील मानवता होमिओपॅथिक हाॅस्पिटल अकॅडमीचे उदघाटन डॉ.अरुण भस्मे (अध्यक्ष होमिओपॅथिक सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य) व डॉ.सोमनाथ गोसावी (प्रशासक महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी मुंबई) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.उद्घाटनपर भाषनात डॉ.अरूण भस्मे यांनी होमिओपॅथी ही लोकाश्रयावर टिकून असून तिला राजाश्रयाची गरज असल्याचे सागत होमिओपॅथीच्या मागण्यासाठी 2013 प्रमाणे लढा उभारावा लागेल असे सांगितले.यावेळी डॉ.बाळकृष्ण गायकवाड (प्रशासकीय सदस्य महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी मुंबई), डॉ.प्रतिक तांबे (प्रशासकीय सदस्य महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी मुंबई), डॉ.राजेश डेरे(सिनेट सदस्य महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक), डॉ.अभय छेडा, डॉ.संतोष अवचार (सदस्य महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समिती), डॉ.सी.आर.शुक्ला, डॉ.रुपाली गोसावी, डॉ.विदया साळुंखे, डॉ.सुदेशकुमार धारस्कर, डॉ.हेतल गाला, डॉ.समिर चौकार, डॉ.बी.आर.मिश्रा, डॉ. विभूती, डॉ. मोरया, डॉ. वर्मा इ. प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थीत होते.प्रस्ताविकात मानवता होमिओपॅथिक हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेश पालांडे यांनी होमिओपॅथीक उपचार पद्धतीने सर्दी, खोकल्या पासून अतिदुर्धर आजारावर सहजरित्या उपचार केले जाऊ शकतात. मी 35 वर्षापासून होमिओपॅथिक उपचार पद्धतीने उपचार करत असून मीरा-भाईंदर या ठिकाणी शास्त्रशुद्ध होमिओपॅथीचे प्रशिक्षण देणारी एकही संस्था नव्हती ही काळाची गरज ओळखून मी मानवता होमिओपॅथिक हॉस्पिटलची स्थापना केली असून या ठिकाणी स्वस्तात स्वस्त पद्धतीने होमिओपॅथिक उपचार करणार असून जे नवीन होमिओपॅथ, ज्यांना होमिओपॅथी शिकण्याची इच्छा आहे अशांना सुद्धा इथे शास्त्रशुद्ध पद्धतीने होमिओपॅथीचे प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले.यावेळी डॉ. सोमनाथ गोसावी , डॉ. राजेश ढेरे, डॉ बाळकृष्ण गायकवाड डॉ प्रतिक तांबे, डॉ. संतोष अवचार, डॉ. रूपाली गोसावी, डॉ.सुदेशकुमार धारस्कर, डॉ. शुक्ला, डॉ. अभय छेडा, डॉ. चौकार इ.शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.सर्वाचे स्वागत डॉ.सौ.स्नेहल पालांडे, डॉ.आशिष पालांडे, डॉ. किर्ती, डॉ. अक्षदा म्हात्रे आणि मिरा भाईंदर होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्या वतीने करण्यात आले.










