*ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण श्री.आण्णा हजारे यांची पैलवान संग्राम कांबळेनी घेतली सदिच्छा भेट…*
अकलूज (प्रतिनिधी )
ज्येष्ठ समाजसेवक, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे प्रणेते,पद्मभूषण श्री.आण्णा हजारे यांची आज राळेगणसिद्धी मध्ये कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे मुख्य प्रवक्ते पैलवान संग्राम कांबळे यांनी सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले.”यावेळी कुस्ती क्षेत्रात करत असलेल्या कार्याबद्दल पैलवान संग्राम कांबळे यांनी अण्णांना माहिती सांगितली त्यांचे कार्याचे आण्णानी कौतुक केले व निडर होऊन आणि निर्भयपणे कुस्ती क्षेत्राची व समाजाची सेवा करा असा अनमोल संदेश सुद्धा दिला तसेच आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष पै.मिलिंद जपे सर, श्री.ज्ञानेश्वर अस्वले उपस्थित होते.








