• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

होमिओपॅथी ही तर्कशुद्ध शास्त्रीय उपचार पद्धत मात्र रुग्ण बरे झाल्याचे शास्त्रीय विवेचन करणे ही काळाची गरज : डॉ. अविनाश पाणबुडे.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 10, 2023
in आपला जिल्हा
0
होमिओपॅथी ही तर्कशुद्ध शास्त्रीय उपचार पद्धत मात्र रुग्ण बरे झाल्याचे शास्त्रीय विवेचन करणे ही काळाची गरज : डॉ. अविनाश पाणबुडे.
0
SHARES
123
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

होमिओपॅथी ही तर्कशुद्ध शास्त्रीय उपचार पद्धत मात्र रुग्ण बरे झाल्याचे शास्त्रीय विवेचन करणे ही काळाची गरज : डॉ. अविनाश पाणबुडे.

इंदापूर वार्ताहर ता. १०

होमिओपॅथी ही तर्कशुद्ध शास्त्रीय उपचार पद्धत असून याचा मी स्वत: अनुभव मुतखड्या साठी घेतला आहे. मात्र होमिओपॅथीक औषधाने बरे झालेल्या रुग्णांचे संशोधनात्मक, तंत्रशुद्ध मूल्यांकन सर्वांसमोर येणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन इंदापूर आयएमए चे माजी तालुकाध्यक्ष व हदयरोग तज्ञ डॉ. अविनाश पाणबुडे यांनी केले. होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हनेमन यांच्या जयंती निमित्त दिनांक १० एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथिक दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात भारत सरकार आयुष मंत्रालय, इंदापूर तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना तसेच आरोग्य संदेश प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. हनेमन यांच्या प्रतिमेचे पूजन इंदापूर आयएमए चे अध्यक्ष डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. महेश रूपनवर, डॉ. अनिल पुंडे- शिर्के, निमा संघटनेचे डॉ. अर्जुन नरुटे, डॉ. समीर मुलाणी, डॉ. लक्ष्मण सपकळ, होमिओपॅथिक संघटनेचे डॉ. अनंग मेहता, डॉ. आशिष दोभाडा, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. नामदेव गार्डे, डॉ. सुहास शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सतीश शिंगाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी डॉ. चंदनशिवे यांनी दिलेली गर्व से कहो हम होमिओपॅथिक डॉक्टर है ही घोषणा लक्षवेधी ठरली.डॉ. पाणबुडे पुढे म्हणाले, होमिओपॅथीस काही लोक प्लेसिबो इफेक्ट मानतात. त्यामुळे होमिओपॅथिकडॉक्टरांनी विविध आजारावरील तंत्रशुद्ध निकाल सर्वां समोर पुराव्यासह आणणे गरजेचे आहे. आपण स्वतः होमिओपॅथिक औषधांमुळे मुतखडा मुक्त झालो आहे तर ही पद्धत विविध जुनाट आजारांसाठी प्रभावी आहे. या चिकित्सा पद्धतीचे अनेक डॉक्टर पूर्वी आधुनिक चिकित्सा शास्त्राचे एम डी पदवीधर होते. त्यांनी या चिकित्सा पद्धतीच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. माझा देखील या उपचार पध्दतीवरील विश्वास वाढला असून सर्व चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांनी सर्वसमावेशक पद्धतीने वैद्यकिय सेवा द्यावी असे आवाहन त्यांनी केले.यावेळी आरोग्य संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष, जनरल सर्जन डॉ. श्रेणिक शहा म्हणाले, ऑपरेशन नंतर पोट फुगणे, आतड्यात आतडे अडकणे, स्पायनल हेडेक, १० एम ते ५१ एमएम पर्यंतचे मुतखडे, युरेथ्रल स्ट्रीक्चर आदी आजारात होमिओपॅथीची उपयुक्तता आम्ही पाहली आहे. सर्व डॉक्टरांनी रुग्णदेवोभव या तत्त्वाने आपआपल्या शास्त्राची ताकद व मर्यादा लक्षात घेवून वैद्यकिय सेवा करावी असे आवाहन त्यांनी केले.यावेळी होमिओपॅथिक संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. संदेश शहा, निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालय आयुष होमिओपॅथिक वैद्यकिय अधिकारी डॉ. अरविंद अरकिले, डॉ. अमर फुले, डॉ. रणजित कोरटकर, डॉ. सचिन ननवरे यांनी आपले अनुभव विशद केले.स्वागत डॉ. सचिन बाबर, डॉ. रियाज पठाण, डॉ. निलेश कुंभार यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन इंदापूर उपजिल्हा रुग्णालय आयुष होमिओपॅथिक वैद्यकिय अधिकारी डॉ. सूर्यकांत बनसुडे यांनी केले.यावेळी डॉ. अतुल वणवे, डॉ. सचिन बिचकुले, डॉ. ऋषिकेश गार्डे, डॉ. उदय कुरुडकर, डॉ. अनिल रासकर, डॉ. मधुकर राऊत, डॉ. अमित मारकड, डॉ. स्वप्नील शेलार, डॉ. अमीर मुलाणी, डॉ. हंसी चौधरी, डॉ. मानसी चंकेश्र्वरा, डॉ. निधी सोनवणे उपस्थित होते.

जागतिक होमिओपॅथी दिवस :

सर्जिकल होमिओपॅथी : होमिओपॅथी जागतिक योगदान सिद्ध करून मानव, प्राण्यांना ठरली वरदान. २२६ वर्षात होमिओपॅथी ने दिले करोडो लोकांना तसेच पशू पक्ष्यांना जीवदान

होमिओपॅथीचा इतिहास :

होमिओपॅथीचे जनक डॉ. ख्रिश्चन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनेमन यांचा जन्म १० एप्रिल १७५५ रोजी जर्मनी मध्ये झाला. सन १७७९ मध्ये ते आधुनिक वैद्यकीय चिकित्सा मध्ये ते पदवीधर एम. डी. डॉक्टर झाले. त्यानंतर त्यांनी आपला वैद्यकिय व्यवसाय सुरू केला. मात्र त्यावेळी प्रचलित उपचार पद्धतीमुळे अनेकदा रुग्णांना मृत्यू येत होता. त्यामुळे त्यांनी आपला व्यवसाय बंद करून वैद्यकिय पुस्तकांचे जर्मन भाषेत भाषांतर सुरू केले. सन १७९० मध्ये कुलेन मटेरिया मेडिकाचे भाषांतर करत असताना त्यांना सिंकोना बार्क या वनस्पती मध्ये ताप निवारण करण्याची ताकद असल्याचे समजले. ही वनस्पती ताप बरा करत असेल तर निरोगी माणसामध्ये ती ताप सदृश्य लक्षणे तयार करते असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी हा प्रयोग स्वतःसह मित्र परिवार यांच्यावर केला. या सुवर्ण प्रयोगाची त्यांनी १७९६ मध्ये घोषणा करून जगास होमिओपॅथीची देणगी दिली. संपूर्ण जगात जनाश्रय लाभलेल्या या चिकित्सा पद्धतीने जगात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

भारतात होमिओपॅथी :सन १८१० मध्ये जर्मन डॉक्टर तसेच लंडन मिशनरी सोसायटीचे डॉ. मुल्लेंस यांनी ही पद्धत भारतात कोलकता येथे सुरू केली. डॉ. जॉन मार्टिन हनिंगबर्गर यांनी सन १८३९ मध्ये ही पद्धत भारतात आणली. पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांच्यावर त्यांनी औषधोपचार केले. त्यांना कॉलरा डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. सन १८४६ मध्ये सर्जन सम्युएलब्रुकिंग यांनी दक्षिण भारतात तंजावर आणि पदुकुटा येथे होमिओपॅथिक हॉस्पिटल सुरू केले. सन १८६१ ते १८६३ मध्ये बाबू राजन दत्ता यांनी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर तसेच राधाकांत देव बहादुर यांना बरे करून होमिओपॅथी लोकप्रिय केली. त्यानंतर डॉ. महेंद्र लाल सरकार, डॉ. बी. एल बहादुरी, डॉ. पी. सी. मुजुमदार, डॉ. बॅनर्जी यांनी या चिकित्सा पद्धतीचे शास्त्रोक्त महत्त्व लोकांना पटवून दिले. महाराष्ट्रात होमिओपॅथी :महाराष्ट्र शासनाने देखील होमिओपॅथीची दोन मूलभूत पुस्तके प्रसिद्ध करून याची ओळख जनतेस करून दिली. डॉ. ढवळे, डॉ. दफ्तरी, डॉ. पळसुले, डॉ. पाठक यांनी देखील होमिओपॅथीच्या प्रचारासाठी योगदान दिले आहे. होमिओपॅथिक औषधे ही वनस्पती, खनिजे, प्राणी उत्पादने यांसारख्या नैसर्गिक संसाधनांपासून बनवली जातात. अनेकजण या शास्त्रास चिकित्सा पद्धत न मानता प्लेसिबो इफेक्ट मानतात. मात्र ज्यावेळी त्यांच्या घरी आजारपण येते, त्यावेळी ते सुरक्षित औषध म्हणून होमिओपॅथीस प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. कारण ही उपचार पद्धती रोग प्रतिकारक शक्ती अबाधित ठेवण्यावर भर देते. त्यामुळे ही उपचार पद्धत लोकप्रिय झाली आहे. या चिकित्सा पद्धतीने विविध जीवन शैलीचे आजार, व्हायरल व बॅक्ट्रेरियल आजार यावर आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे

ही औषधे विविध शस्त्रक्रिया टाळण्या साठी, शस्त्रक्रियेच्या जखमा बऱ्या करण्या साठी तसेच वेदना निवारक म्हणून स्पायनल हेडेक बरी करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. शस्त्र क्रिये पूर्वी ही औषधे दिल्यास ऑपरेशन ची देखील भीती कमी होते. ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया अत्यावश्यक आहेत, त्या केल्याच पाहिजेत, मात्र जिथे इमर्जन्सी नाही, तिथे सेकंड ओपिनियन म्हणून होमिओपॅथीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. मान्यवर : राष्ट्रपिता महात्मा गांधी, जेष्ठ अभिनेते दिलीपकुमार, सायरा बानू, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे सुध्दा होमिओपॅथीचे औषध घेतात. मी स्वतः इंदापूर येथे श्री राम रथ यात्रा आल्यानंतर जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, प्रसिद्ध रंग भूमी कलाकार प्रशांत दामले तसेच अनेक मान्यवरांना होमिओपॅथिक औषधे यशस्वी पद्धतीने वापरली आहेत.

सर्जिकल होमिओपॅथी :

मी माझे जेष्ठ बंधू जनरल सर्जन डॉ. श्रेणिक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सर्जिकल आजार असलेले हजारो रुग्ण बरे केले आहेत. हा योगा योग नसून यामागे मोठी साधना आहे.मुतखड्याचे हजारो रुग्ण बरे झाले असून पुन्हा मुतखडे होण्याचे प्रमाण अत्यल्प आहेत. किडनी मध्ये तळात असलेला अगदी ५१ एमएम चा मुतखडा देखील तुकडे तुकडे होवून गेला आहे. मूत्रवाहिनी, किडनीच्या वरच्या व मधल्या भागातील मुतखडे लवकर जातात तर किडनी मध्ये तळात असलेले मोठे खडे जाण्यास वेळ लागतो. पित्ताशयातील खडे, मूळव्याध, भगिंदर, कंबरेच्या मणक्यातील दोष, गुडघेदुखी, नाकात हाड किंवा मांसल भाग वाढणे, कुरुपे, चामखीळ, शरीरावरील तसेच शरीरातील विविध प्रकारच्या गाठी, फॉरेन बॉडी, थायरॉईड ग्रंथीच्या गाठी, अपेंडिक्स, महिलांमध्ये पिशवी तसेच स्त्री बिजांडाच्या गाठी आदी ४० प्रकारच्या विविध शस्त्रक्रिया रुग्णांची लक्षणे जुळल्यास होमिओपॅथीमुळे निश्चित टळू शकतात हा आमचा अनुभव आहे. मात्र त्यासाठी रुग्णांनी गुगल डॉक्टरवर अवलंबून न रहाता प्रत्यक्ष तपासणी करणाऱ्याहोमिओपॅथिक डॉक्टरला व्यवस्थित माहिती देणे गरजेचे आहे. होमिओपॅथीक औषधांसोबत कच्चा कांदा, लसूण, कॉफी तंबाखू, गुटखा न खाल्यास आणखी लवकर गुण येवू शकतो.होमिओपॅथिक औषधी गर्भवती महिला तसेच लहान बाळांना देखील उपयुक्त आहेत मात्र त्यासाठी तज्ञ डॉक्टरांकडून औषधोपचार करून घेणे गरजेचे आहे. ॲक्युट डिसीजेस असणाऱ्या सर्दी, थंडी ताप, खोकला, डेंग्यू, टायफाईड, मलेरिया आदी आजारांवर होमिओपॅथीक औषधांचा लगेच गुण येतो. या आजारात दिली जाणारी औषधे शरीरा तील रोग प्रतिकारशक्ती वाढवून आजार बरे करतात.

सध्याच्या जगात चिंतेचा विषय असणाऱ्या व्हायरल कोविड १९ वर सुद्धा होमिओपॅथी प्रभावी व गुणकारी ठरली आहे. कोरोना महामारीत २२०० रुग्णांना हॉस्पिटल मध्ये बेड मिळाली नाही, त्यांचा स्कोअर १० पासून २० पर्यंत होता. अश्या रुग्णांना घरच्या घरी बरे करण्यात आम्हाला यश आले. त्याचे श्रेय डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या होमिओपॅथीस जाते. त्यामुळे डॉ. सॅम्युअल हॅनेमन हे देवमाणूस म्हणून मान्यता प्राप्त आहेत.

पशुधन संवर्धन :

पशुधनाच्या स्तनावरील चामखिळा, गाठी, लंपी आदी आजारा बरोबरच दूध वाढी साठी देखील होमिओपॅथिक औषधे उपयुक्त आहेत. त्यामुळे आपल्या कृषी प्रधान देशात पशूधनाचे आरोग्य जपण्यासाठी तालुका निहाय होमिओपॅथिक हॉस्पिटल होणे गरजेचे आहे.होमिओपॅथीस शंभर टक्के राजाश्रय हवा :आपल्या देशात आधुनिक चिकित्सा पद्धत तसेच प्राचीन आयुर्वेदिक पद्धतीस राजाश्रय आहे तर होमिओपॅथीस थोड्या प्रमाणात राजाश्रय तसेच मोठ्या प्रमाणात जनाश्रय आहे. त्यामुळे या चिकित्सा पद्धतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र संचनालय, होमिओपॅथिक डॉक्टरांना सरकारी नोकऱ्या, तालुका निहाय हॉस्पिटल व क्लिनिकल संशोधन केंद्र आदी सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. तसे झाल्यास तो होमिओपॅथीचा निश्चितच सुवर्णकाळ ठरेल.

आमचे गुरूजनआमच्या होमिओपॅथीच्या यशस्वी वाटचालीसाठी आम्हास डॉ. सुभाष बारकी, डॉ. बाहुबली शहा, डॉ. अरुण जाधव, डॉ. डी. के. पाटील, डॉ. दादा साहेब कवीश्वर, डॉ. पी. वाय. कुलकर्णी, डॉ. एम. बी. पाटील, डॉ. बी. बी. पाटील, डॉ. जे. एस. पाटील, डॉ. रवी पाटील, डॉ. एम. पी. आर्य, डॉ. कुमठा, डॉ. हरी घोलप, डॉ. के. सी. शहा, डॉ. मनीषा सोलंकी, डॉ. राधेश्याम गुंजाळ, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. संजय शिंदे तसेच आजादी बचाव आंदोलनाचे प्रणेते राजीवभाई दीक्षित यांचे अनमोल सहकार्य लाभले. त्यामुळे उपरोक्त मान्यवर, सहकारी तसेच होमिओपॅथिक औषधे घेणारे रुग्ण यांचे आम्ही कायम स्वरुपी ऋणी आहोत.

होमिओपॅथिक आनंदसुपरस्टार राजेश खन्ना यांनी सुप्रसिद्ध आनंद या चित्रपटात कॅन्सर झालेली अमर भूमिका साकारली असून त्यांच्यावर विद्यमान सुपरस्टार अमिताभ बच्चन डॉक्टर म्हणून औषधोपचार करताना दाखवले आहे. चित्रपटात राजेश खन्ना यांच्या मृत्यू प्रसंगी अमिताभ बच्चन हे डॉ. बॅनर्जी यांचे होमिओपॅथीक औषध आणा असे म्हणतात. तर मला एवढेच सुचवायचे आहे की जीवनाचा आनंद लुटण्यासाठी पहिल्या पासून होमिओपॅथिक औषध सुरू केल्यास निश्चित आपल्यास दीर्घायुष्य लाभेल. त्यामुळे होमिओपॅथिक औषधे वापरणे ही काळाची गरज आहे.

डॉ. संदेश शहा. मो. 9922419159डॉ. राधिका संदेश शहा.मो. 7972544521डॉ. संदेश शहा हर्बल वर्ल्ड, सुश्रुत हॉस्पिटल, इंदापूर जिल्हा पुणे.(सोमवार ते बुधवार.)………………………डॉ. शहा ‘ ज होमिओपॅथिक होलिस्टिक क्लिनिक, रॉयल ऑर्केड, श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या मठाशेजारी, पुणे सातारा रोड, धनकवडी, पुणे. ( गुरुवार ते रविवार )

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ
आपला जिल्हा

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

October 7, 2026
ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
50% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण या एकमेव उद्देश प्राप्ती साठी शक्तिपीठ तुळजापूर ते मंत्रालय मुंबई ‘मराठा वनवास यात्रा’ चे आयोजन

50% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण या एकमेव उद्देश प्राप्ती साठी शक्तिपीठ तुळजापूर ते मंत्रालय मुंबई 'मराठा वनवास यात्रा' चे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In