*लोकराजा राजर्षीं शाहू छत्रपती महाराज स्मृती शताब्दी वर्षात शाहूंचे चरित्र, विचार अंगीकारणे हा आपला ध्यास पाहिजे .*अँड संभाजीराव मोहिते*
कोल्हापूर दि.९ (संजय लोहकरे यांजकडून)
लोकराजा राजर्षीं शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्षात राजाचे चरित्र व विचार सर्वानी अंगीकृत करणे हा आपल्या सर्वांचा ध्यास पाहिजे असे प्रतिपादन अँड संभाजीराव मोहिते यांनी केले. अँड संभाजीराव मोहिते (छत्रपती शाहू महाराज चरित्र अभ्यासक,व्याख्याते,लेखक) हे लोकराजा राजर्षीं छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्षांचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात 10 फेब्रुवारी ते 10 एप्रिल पर्यंत 100 व्याख्याने देणार आहेत.त्या निमित्त आज लोकराजा राजर्षीं छत्रपती शाहू महाराज राजा आणि माणूस या विषयावर व्यख्यान आयोजित करणेत आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल मॅडम हजर होत्या. यावेळी अध्यक्ष ॲड.गिरीश खडके यांचे हस्ते प्रमुख व्याख्याते ॲड.संभाजीराव मोहिते यांचा सत्कार शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी व्याख्याते ॲड. संभाजीराव मोहिते म्हणाले की, लोकराजा छत्रपती राजर्षीं शाहू महाराज हे जनतेचे खरे राजा होते.राजर्षीं शाहू महाराजांनी करवीर संस्थानात पडलेला दुष्काळ,प्लेग साथ यावेळी दाखवलेली तत्परता व जनतेची घेतलेली काळजी हे राजा म्हणून आज ही आदर्शवत आहे. छत्रपती शाहू महाराज हे जलसंपत्ती,उद्योग,रोजगार, देणारा पाहिला दूरदृष्टी राजा होता.राजर्षीं छत्रपती शाहू महाराज हे स्वस्त धान्य दुकान ही संकल्पना निर्माण करणारे पहिले राजे आहेत.शाहू महाराज यांनी शिक्षणात,कुस्ती,व्यापार,उद्योग या मध्ये केले कार्य आज ही दिशा दर्शक आहे म्हणून शाहू हे खरे राजाश्रय,कृतिशील आदर्श, उत्तरदायित्व देणारा राजा आहे. सर्व जातीचे मुलांना शिक्षण घेता यावे या करीता वसतिगृह जननी निर्माण केली. या कार्यक्रमास बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके,उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण,बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड.महादेवराव अडगुळे,ॲड.संदीप चौगुले,ॲड. तृप्ती नलवडे,माजी अध्यक्ष ॲड.शिवाजीराव राणे,ॲड.प्रशांत चिटणीस,ॲड.अजित मोहिते, ॲड.रणजित गावडे तसेच सन्मानीय न्यायाधीश,सर्व सभासद वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रस्ताविक,स्वागत सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख यांनी केले.तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष ॲड.सुधीर चव्हाण यांनी मानले.








