अकलूज मध्ये 6मार्च रोजी साजरा होणार नो कंप्लेंट डे
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज मध्ये 6मार्च 2022रोजी मोठया उत्साहात अकलूज पोलीस ठाणे हद्दीत नो कंप्लेंट डे साजरा करण्यात आला होता. यात सर्वांनी हिरीरीने सहभाग नोंदविला होता. अगदी याच धर्तीवर 6मार्च 2023रोजी देखील हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.या उपक्रमात पोलीस मित्र परीवार संघ आणि ज्येष्ठ नागरीक, रोटरी क्लब , ग्रामसूरक्षा दल, पोलीस पाटील, व्यापारी संघ, मान्यवर सामाजीक कार्यकर्त, मान्यवर पत्रकार महासंघ, मान्यवर सामाजीक कार्यकर्ते, वाहतूक करणारे वाहनधारक तीनचाकी व चार चाकी संघटना, डॉक्टर्स व मेडीकल स्टॉफ, मान्यवर वकील व शिक्षक विदयार्थी आणि मान्यवर विविध संघटना व राजकीय नेते मंडळी यांचे सहकार्याने६ मार्च २०२३ हा दिवस नो कंप्लेंट डे साजरा होणार आहे.या दिवशी महाराष्ट्र पोलीसांना निवांतपणा मिळणार आहे. कामाचा ताणतणाव एक दिवसासाठी कमी होणार आहे. तरी आपण आपले परीचयातील सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, कार्यकर्ते व मंडळ सदस्य, विभाग, पभाग, मतदारसंघातील चाहता वर्ग यांना एक दिवसासाठी शांततेचे आवाहन करून पोलीस विभागाला सहकार्य करून शांततेची एकी दाखवायची आहे.आपली शांतता हाच आमचा उदात्त हेतू असून आपण सर्वांनी यात सहभागी व्हावे. असे आवाहन अकलूज पोलीस ठाणे चे समन्व्यक रमेश सुरवसे पाटील,राज्यसंघटक म. राज्य विष्णू आंधळकर रसीदभाई शेख राज्यसंघटक म. राज्य संपर्ण पोलीस मित्र परीवार संघ, महाराष्ट्र राज्य यांचे वतीने करण्यात आले आहे.
६ मार्च २०२३ रोजी काय करायचं:-
आपले घरात गल्लीत शक्यतो भांडण, मारामारी, वादावादी होवू देवू नये. नातेवाईक व मित्रमंडळी, कार्यकर्ते यांनाही सांगून शांतता राखावी, वाद झाल्यास शक्यतो जागेवरच मिटवावा. दोन्ही पाटयता सामोपचाराने समज देवून मिटवावे. आपली दोन चाकी व चारचाकी वाहने हळू चालवावीत, किमान वेग ४०ते ५० कि.मी. प्रमाणे असावा जास्त वेगात जावून कट मारणे, अपघात होणे असे प्रकार होवू देवू नये. जरी झाले तरी जागेवर नूकसान भरपाई ठरवून सामोपचाराने समज देवून मिटवावे. जूने भांडण शेतीचा वाद, नळावरील भांडणे, पैसे देवाणघेवाण वरून भांडणे होवू देवू नये. न्याय व्यवस्था व पोलीस विभाग यांना किरकोळ वाद व भांडणाचा व खोट्या तक्रारीचा नेहमीच प्रचंड त्रास व प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर होवून ख-या लोकांना न्याय मिळायलाप्रचंड त्रास व उशीर होत आहे. अनेक खटले माननीय कोर्टात अनेक वर्षापासून दाखल आहेत या बाबत कुणीच काही करू शकत नाही परंतू एक दिवस आपण शांतता राखली तर महाराष्ट्र पोलीस विभागाचा ताणतणाव व धावपळ नक्कीच कमी होईल यात शंका नाही. जरी वादावादी झाली किंवा भांडणे झाली तरी समंजसपणाने सोडवू दोन्ही पाटर्यांना सामोपचारांने सांगून वाद सोडवू ही भूमिका आपण घेणार आहोत. आपण घ्याच हीच विनंती आहे.भांडणे तंटे मिटवा, उगीच कोर्टाची पायरी चढून खोट्या केसेस करून, आपला पैसा व वेळ बाया घालवून पिढयानपिढया वैर कशाला ठेवायचं, लाखो रुपये घालवून जिंकणेपेक्षा समंजसपणाने आपआपसात चर्चा करून मिटवू ही भूमीका आपण घेणार आहोत. याला पोलीस आणि माननीय कार्ट यांची सूध्दा समंती आहे. सहकार्य आहे.मागील वर्षी हे आपण केलेल आहे. यशस्वी झालेलो आहोत, यावर्षीही करणार आहोत. अर्थात याचे मानकरी आपणच आहात. आम्ही मात्र निमित्त माञ आहोत.आपला सहभाग व शांतता हेच अमूल्य आहे. तरी परिसरातील सर्वांनी यात सहभागी व्हावे. असे आवाहन करण्यात आले आहे.सूचना सर्वांनी ६ मार्चला २०२३ राेजी साेमवारी जास्तीत जास्त संख्येने परीवारात सहभागी व्हावे आपल्या भागातील गल्लीतील राजकीय नेते संघटनेचे नेते व मान्यवर ,प्रतिष्ठीत लाेकांना समक्ष भेटून आपले पत्रक दयावेव नाे कंम्प्लेंन डे ची माहीती देवून शांतता राखण्याची विनंती करावी नाे कंम्प्लेन डे हा जनतेसाठी असून खाेट्या केसेसला आळा घालून गून्हाला प्रतिबंध करण्यासाठी आहे अपघात व अकस्मात मयत हे नैसर्गिक आहेत ते नाेंद हाेतील नेा कंम्प्लेन डे साजरा हाेताना सर्वांचाच फायदा हाेताेय .. जनतेचा पैसा आणि वेळ वाचताे …पाेलीसांचा ताणतणाव कमी हाेताे …आणि मा. काेर्टाला खरा न्याय देण्यासाठी वेळ मिळताे हा दिवस संपूर्ण भारतात फक्त महाराष्ट्रात साजरा हाेताेय ताेही साेलापूर जिल्हांत सतत दाेन वर्षापासून हा बहूमान अकलूजकरांना मिळताेय … लवकरच आपल्याही गावात व शहरात हा दिवस साजरा करू एक पाऊल गून्हेगारी च्या विराेधात …चला सहभागी व्हा …आपली शांतता हाच आपला सहभाग …
आपली माणसं आपला परीवार पाेलीस मित्र परीवार



















