.*अकलूज येथे व्यसन मुक्तीची होळी करत होळीचा सण साजरा केला.*
संग्रामनगर दि.६ (संजय लोहकरे यांजकडून)होळीच्या पवित्र सणामध्ये अग्नीत वाईट विचार,प्रवृत्तींचा नाश करत असताना आपण करीत असलेल्या व्यसनांना ही जाळून टाकण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे प्रतिपादन अकलूज नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे यांनी केले. अकलूज येथे व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र,आम्ही अकलूजकर व अकलूज नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चला व्यसनांची होळी करू या,निरोगी जीवन जगू या या अभिनव उपक्रमात पारंपरिक पद्धतीने होळी न करता गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची होळी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या उपक्रमाबद्दल माहिती देताना प्रा.धनंजय देशमुख यांनी आम्ही अकलूजकर परिवाराच्या वतीने वर्षभरात विविध सामाजिक कार्यक्रम राबवित असतो.त्यातून समाज प्रबोधनाचे कार्य चालू असते त्यामध्ये प्रामुख्याने व्यसन मुक्तीसाठी कार्यक्रम हाती घेतलेला असून त्यातून भावी पिढी निरवेसणी व सुंदर आरोग्यसाठीचे कार्य करीत आहे. या कार्यक्रमास बाळासाहेब वाईकर,मनोज गवळी,नरेंद्र पाटोळे,आकाश ठोंबरे,राहुल इंगोले,विक्रम एकतपुरे,धनंजय कुंभार,श्रीकांत करडे,इम्रान शेख आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदेश ठाकूर, संकेत जावीर,दिपक जाधव, चैतन्य कुलकर्णी,सुरज खेत्री यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद महाडिक यांनी तर आभार रोहित शेटे यांनी मानले.








