बस हुई महंगाई की मार, नही चाहिए मोदी सरकार
वार्ताहार:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत युवा सेना उपजिल्हा प्रमुख सोनू भैय्या पराडे पाटील शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख पुनमताई अभंगराव युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे यांच्या वतीने गॅस दरवाढ विषयी आंदोलन करण्यात आले .यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नामदेव नाना वाघमारे शिवसेना अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे युवा सेना शहर प्रमुख शेखर खिलारे उपस्थित होते. यावेळी बस हुई महंगाई की मार, नहीं चाहिये मोदी सरकार.फडणवीस -शिंदे भाई है, महाराष्ट्र मे महंगाई छाई है… अब की बार महंगाई की मार… मोदी सरकार हाय हाय… गॅस दरवाढीचा निषेध असो… अशा घोषणा देत आणि लाकडानी पेटवलेल्या चुलीवर भाकरी भाजत डाळ भात शिजवत अकलूज येथील शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून गॅस दरवाढ व महागाई विरोधात राज्य व केंद्र सरकारचा निषेध करून चुली वर भाकरी करून डाळ भात शिजवून आंदोलन करण्यात आले.दरम्यान युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे म्हणाले की २०१३ साली घरगुती गॅस चे दर ४१० रुपये होते तेच दर २०२३ रोजी ११५० रुपये झाले आज राज्य व केंद्र सरकार या दोघांनीही महागाईने सामान्य जनतेचे हाल केले असून पुढील काळात हे आंदोलन अधिक व्यापक केले जाईल असा इशारा यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला. शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख पुनम अभंगराव म्हणल्या की शिवसेना ठाकरे गटाकडून महागाईच्या विरोधात चुलीवर भाकरी भाजून आंदोलन करून राज्य व केंद्रातील केंद्र सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत.महागाई वाढवून जनतेचे हाल केले आहेत.२०१४पासून गॅस सिलेंडरची किंमत तिप्पट वाढली आहे तर पेट्रोलचे भावही गगनाला भिडले आहेत. उद्योग, रोजगार याची केवळ आश्वासने | देऊन दुसरीकडे महागाई वाढवली जात आहे. अधिवेशनात महागाईच्या मुद्द्यावर सरकार काहीच बोलत नाही.महाराष्ट्रावर बोलणाऱ्या इतरांचा सत्कार करायचा आणि खासदार संजय राऊत यांच्या वर हक्कभंग आणायचा असे करून सरकार महागाई पासून जनतेचे लक्ष विचलित करुण पाहत आहे.महागाईने जनतेचे जगणे मुश्किल बनले आहे. जनतेला पुन्हा चुली पेटवाव्या लागणार आहेत. म्हणूनच आज आम्ही चुलीवरील भाकरी भाजून डाळ भात शिजवून आंदोलन छेडत आहोत. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नामदेव नाना वाघमारे म्हणाले की मोदी सरकारने गॅस योजना राबवून घरघरात गॅस सिलेंडर दिल, मात्र त्याच गॅस द्वारे लूट करून सरकार तोंडातील घास हिरावून घेणार याची कल्पना जनतेला नव्हती.मात्र आम्ही सरकारच्या गळ्याचा फास आवळल्या शिवाय गप्प बसणार नाही. तसेच यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत म्हणाले की खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेले भाजपचे मोदी सरकारचे पितळ आज महागाईचा आगडोंब उसळल्याने उघडे पडले आहे.तसेच युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे म्हणाले की पेट्रोल, गॅस सिलेंडर व वीज यांच्या दरवाढ जनतेच्या सहनशीलते पलीकडची आहे. महागाईतून सरकारने शेतकरी आणि गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे. व्यापक स्वरूपात आंदोलन पेटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही सुभाष काकडे म्हणाले. यावेळीसंगीता पवार डॉ राजश्री क्षिरसागर मंजुळा धोडमीसे अनिता आसबे जयश्री इंगळे पल्लवी साळुंखे महादेव बंडगर उमेश जाधव दत्ताभाऊ साळुंखे डाॅ निलेश कांबळे दुर्वा अडके गणेश बनकर देवा लोखंडे मिलिंद मोरे जयेश पराडे,आण्णा पराडे,गणेश पराडे, किरण भांगे, पिंटू चव्हाण सुरज साठे,अर्जुन लोखंडे,सुजित रणदिवे,अजय नाईकनवरे,सागर लोखंडे सतिश कुलाळ,सुनिल मिसाळ,चेतन लोखंडे,अजय मिसाळ,अमर खंडागळे,गणेश काटे ,सचिन लोखंडे,पप्पु जाधव,पप्पु जगताप नानासाहेब बंडगर गोरख पवार लाला मगर अनिल घाडगे सुनिल कांबळे मनोज जगताप सूनका जाधव विकास दळवी शंकर पाटील ई युवा सैनिक उपस्थित होते









