आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मारकडवाडी येथे 8मार्च रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा मारकडवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे इयत्ता 1ली ते 4थी व 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व सर्व ग्रामस्थ मारकडवाडी.तसेच पै रवि घुले .यांचे वतीने 8मार्च रोजी भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे.या स्पर्धेचे बक्षीस वितरण 9मार्च रोजी होणार आहे.या स्पर्धेतील विजेत्यांना 1ली ते 4 थी लहान गट बक्षीस प्रथम क्रमांक सन्मानचिन्ह,द्वितीय क्रमांक सन्मानचिन्हतृतीय क्रमांक सन्मानचिन्ह,तसेच 5 वी ते 7 वी मोठा गट बक्षीसप्रथम क्रमांक सन्मानचिन्ह,द्वितीय क्रमांक सन्मानचिन्ह,तृतीय क्रमांक सन्मानचिन्ह,प्रत्येकी गटातील उत्कृष्ट चित्रास व आकर्षक चित्रास लहान गट 3 मोठा गट 3 साठी आकर्षक मेडल बक्षीस देण्यात येणार आहे.अशी माहिती पै.रवी घुले यांनी दिली.








