*नागेश मगर यांचा सत्कार*
अकलूज: येथील शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या महाविद्यालयातील प्राध्यापक नागेश मगर यांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापिठाकडून पी.एचडी ही पदवी बहाल करण्यात आली. डॉ. मगर यांचा या यशाबद्दल महाविद्यालय विकास समीतीचे अध्यक्ष तानाजीराव काशीद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी महाविद्यालय विकास समीतीचे पालक संचालक डॉ. विश्वनाथ आवाड, सदस्य विनोद क्षीरसागर, शहजादी काझी,संस्थेचे प्रशासनाधिकारी अश्रफ शेख, प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले . डॉ. मगर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या समाजमाध्यमांच्या परिणामांचा प्रायोगिक अभ्यास या विषयावर विद्यापीठात प्रबंध सादर केला होता. संशोधन प्रबंध पूर्ण करण्यासाठी डॉ. मगर यांना शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट स्टडीज विभागातील प्रोफेसर डॉ. एन. सी. माळी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते- पाटील, कार्याध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, ज्येष्ठ संचालक शिवदास शिंदे, सचिव धर्मराज दगडे यांनी डाॅ.मगर यांचे अभिनंदन केले.







