[] श्रमसंस्कार शिबिरे विद्यार्थ्याच्या भावी आयुष्यात मार्गदर्शक ठरणार : डॉ. रावसाहेब पताळे
अकलूज (प्रतिनिधी )[] श्रमसंस्कार शिबिरे विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रावसाहेब पताळे यांनी अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई संलग्नित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि. 2 ते 8 फेब्रुवारी 2023 या कालावधीत ‘ युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास, अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती व महिला कौशल्य विकास, स्त्रियांचे आरोग्य, या विषयावर जिल्हा परिषद प्रा. शाळा , मौजे खंडाळी येथे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न झाले. या शिबिराचा सांगता समारंभात केले.[] या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अकलूज येथिल पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. रावसाहेब पताळे हे होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे होते. याप्रसंगी खंडाळी ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती सुनीता सुरवसे, उपसरपंच श्रीमती सुरेखा पताळे, माजी सरपंच रावसाहेब भोसले ग्रामपंचायत सदस्य अमर रिसवडकर, अनिल भोसले, रिकेष चव्हाण, मुख्याध्यापिका श्रीमती महाजन, वाहतूक नियंत्रक राजू गोसावी, ग्रामसेवक रोडे, नाना चंदनकर, दत्तात्रय पताळे, महेशकाका पताळे, महादेव साबळे, पत्रकार मंगेश सोनार, सुरेश सुरवसे, विठ्ठल पताळे, राहुल गनगे, अशोक पताळे, शरद भोसले, दत्तात्रय वाघमारे तसेच डॉ. छाया भिसे, प्रा. के. के. कोरे, कार्यालय प्रमुख विजय कोळी, अविनाश पताळे, दीपा येंजाडे, ग्रामपंचायत खंडाळीचे सर्व कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील स्वयंसेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सात दिवसीय शिबिराप्रसंगी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास या विषयावर डॉ. राजकुमार पाटील यांचे व्याख्यान, संरक्षित अन्नपदार्थ व पोषक पुरक पदार्थ या विषयावर डॉ. जयशीला मनोहर यांचे व्याख्यान व प्रदर्षणी, एल.पी.जी गॅस सुरक्षा या विषयावर भारत गॅस अकलूज चे संदीप देसाई, राजू दळवी व हारून पठाण यांनी प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरण केले. भरतकाम या विषयावरील कार्यशाळेत डॉ. राजश्री निंभोरकर यांनी मार्गदर्शन केले, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर महर्षी प्रशालेचे शिक्षक श्री. अशोक भोसले यांनी मार्गदर्शन केले.खंडाळी येथील आरोग्य केंद्रामध्ये महिला व बालकासाठी कायदे आणि गर्भवती व स्तनदा मातांचा आहार या विषयावर डॉ. छाया भिसे व डॉ. भारती भोसले यांनी मार्गदर्शन केले. बालकांसाठी सृजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर व्यसनमुक्ती, स्त्री जन्म, मोबाईलचे दुरुपयोग या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण, जलसंरक्षण, पर्यावरणाचे संरक्षण, शिक्षणाचे महत्त्व या विषयावर जनजागृती रॅली, जिल्हा परिषद प्रा. शाळेत वृक्षारोपण व परिसर स्वच्छता, वस्त्रशास्त्र विषयासंदर्भात ग्रामस्थांना बांधणी व एम्ब्रॉयडरी वस्तूंचे प्रदर्शन व माहिती, पर्यावरण पूरक उपक्रमाअंतर्गत माती विरहित शेती, स्वयंपाक घरातील कचरा व्यवस्थापन, इत्यादी विषयांवर स्वयंसेवकांनी ग्रामस्थांना माहिती दिली.सदर शिबीर महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा मा. कु. स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ऋषी गजभिये, सूत्रसंचलन कु. सानिया तांबोळी व कु. अक्षरा देवकर आणि आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती भोसले यांनी केले.







