*राष्ट्रपिता महात्मा गांधी” जाणून घ्यायला हरकत नसावी* येणाऱ्या युवा भारतीय पिढीसाठी काय विधायक आहे किंवा काय दिशादर्शक हे समजुन घेण्यासाठी गांधी समजून घ्यावेच लागतील. कारण समाजाच्या समोर नेमके आदर्श कोणते उभे आहेत व उभे रहायला हवेत या व्दिधा अवस्था गांधी हळूच दिवा होवुन मिणमिणत येतात त्यांची आस्तित्व जरी मिणमिणनार जरी असले तरी जेव्हा जेंव्हा गडद आंधार पसरतो तेव्हा हे ज्योतीचं मिणमिणनं खुप सुखाहुन जातं.याच उत्सुकते पोटी आपले कान ऐकणारे व्हावेत मगच मेंदू विधायक विचारानं कट्टर अन खंबीर बनेल..मला स्वतःला कुठल्याही धर्म कट्टरते पेक्षा ही स्वतःची काही विचार किंवा तत्त्व यासाठी सापेक्षतः यावी यासाठी गांधी विचार वाचत रहा, ऐकत रहा, पाहत रहा अन स्वतःची “विचारधारा” ठरवत रहा अस वाटत.. गांधी कधी समजतील तर समाजातल्या प्रतिभावान आणि अभ्यासू व्यक्तींकडून ते समजुन घेतले पाहिजेत. महत्वाचे म्हणजे गांधी समजून घेण्यासाठी गांधीच वाचावे लागतील. बापू वर लाखोंच्या संख्येत लिहली गेलेली पुस्तकं त्यातील निवडक पुस्तकावरील विवेचन, बापूंचे समग्र जीवन,बापूंच्या प्रेरणा आणि त्यांना प्रभावित करणाऱ्या व्यक्ती, बापूंची १८ कलमी रचनात्मक कार्यक्रम, बापूंचे ब्रम्हचर्य, बापूंनी लिहलेली पुस्तकं, बापूंची स्वराज्य संकल्पना, हिंदू-मुस्लिम ऐक्या संबंधित बापुंचे विचार, देशाच्या सध्य परिस्थितीत तारणहार बापूंचे विचार आणि बापूंची धर्म संकल्पना अश्या विविध विषयांवर विस्तृत अवलोकना नंतर ही अजूनही गांधी किती कळाले हे शब्दांत सांगणं कठीणच….याशिवाय आणखिही भरपूर आहेत अस म्हणतात जगात नेपोलीयन नंतर सर्वात जास्त पुस्तके लिहली गेली आहेत ती गांधीजींच्यावर. गांधी विचारातून व आचरणातून आम्हाला एक जाणविते कि आजच्या देशाच्या एकंदरीत परिस्थिती वर ” गांधी विचार” च एकमेव उत्तर असावं ही स्थिती नक्कीच गांधींना ही अभिप्रेत नसावे…कारण गांधी कालातीत जरी असले तरी परिवर्तनवादी होते. बदलास मान्यता देणारे होते. १९२० नंतर गांधी युगाची सुरवात आणि १९४७ ला स्वातंत्र्य प्राप्ती हा उद्देश सफल झाला खरा परंतु गांधींना अभिप्रेत ” भारत ” किंवा सुराज्य फळास आले का ?धर्मनिरपेक्ष राष्ट्रासोबत लोकशाही स्वीकारण्याची धारणा स्वातंत्र्य संग्रामातच रुजली गेली होती हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण १८५७ च बंड पूर्णपणे फसल्याची जाणीव सर्वच काँग्रेसी नेत्यांना होती… आणि यानंतरच्या काळात लोकमान्य टिळकांच्या जहाल मतवादी विचारसरणीतुन १९२० पर्यंतच्या प्रवासात इंग्रज काय करतात यावर आंदोलनाची दिशा देण्याचे काम लोकमान्य टिळक करत असत.या उलट १९२० नंतर इंग्रजांना बापू काय करणार यावर आपली भूमिका ठरवावी लागायची कारण गांधींच्या सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रीच्या प्रभावाखाली होणाऱ्या आंदोलनांनी विधायक वळण घेत सुराज्या कडे वाटचाल सुरू होती..त्यासाठीच्या दबावाखाली अखेर इंग्रजही नमले याहून वेगळं काय ..कोणत्याही युद्धाशिवाय ” स्वातंत्र्य ” हे नाकारता येईल का ?हाच तो प्रवास ज्यात मोहनदास करमचंद गांधी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी होण्याचा..! हे समजून घेता यायला हवं. गांधीं स्वतः धर्मा बाबतीत खूप आग्रही असत ते नेहमी म्हणत धर्मा मध्ये राजकारण नको परंतु राजकारणात धर्म मात्र असायला हवा…नक्की याचा नेमका अर्थ समजायला पहिले गांधी समजायला पाहिजेत. कारण गांधींना अपेक्षित ‘धर्म’ नेमक्या अर्थाने असा आहे. आपल्याला एक तर धर्म ही जन्माने मिळालेली बाब ती खचितच वैयक्तिक ठेवायला हवी यावर ठाम विश्वास ठेवूनच आचरण व्हायला हवे. यात राजकारण नको किंवा सार्वजनिकता नसावी परंतु राजकारणात धर्म असायला हवा… का ? तर गांधीजीचे उत्तर हो असेच होते. धर्म राजकारणात असायला हवा कारण कोणताच धर्म परधर्मा विषयी द्वेष,मत्सर,असूया,तिरस्कार, भेदभाव या गोष्टीच समर्थन करत नाहीत.. याउलट प्रेम, आपुलकी, ममत्व, आपलेपणा, परस्पर सौदार्य, एकजूट व एकसंध समाजव्यवस्था याचं अनुकरण करण्यास प्रेरित करतो हे त्यांच प्रतिपादन होते. जगाने महात्मा गांधीजीच सामाजिक बांधिलकीच तत्वज्ञान स्वीकारले परंतु ज्या मातीत गांधी रुजायला हवे होते तिथेच ही नकारात्मकता वाढीस लागावी हे आपले राजकीय व सामाजिक अपयश म्हणावे लागते. जगाने गांधीजींना डोक्यावर घेतले हे सहजपणे तत्कालीन इतिहासात डोकावलं तर लक्षात येत जागतिक स्तरावर गांधींच्या समकालीन राजकीय वा सामाजिक नेतेमार्टिन लूथर किंग,नेल्सन मंडेला,जेम्स लाव्सन,स्टीव बिको,औंग सू की,मारिया लासर्दा दे मौरा,अलबर्ट आइंस्टाइन,लांजा देल वस्तो,मेडलीन स्लेड तथा मीराबेन जॉन लेनन ,अल गोअर,विनोबा भावे,खान अब्दुल गफ्फार खान तथा सीमान्त गांधी, जमनालाल बजाज, धरमपाल, डॉ.राजेन्द्र प्रसाद, जे.बी.कृपलानी, ठक्कर बापा, रविशंकर महाराज, नानाभाई भट्ट, जे.सी. कुमारप्पा, सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृत कौर, सुशीला नायर, आशादेवी, आर्यनायकम, नीला क्रेम कुक, सरलादेवी चौधरानी, डॉ.सुशीला नायर,आभा गांधी,मनू गांधी, बाबा आमटे, डॉ.रवींद्रनाथ टागोर,आप्पा पटवर्धन ही अशीच यादी भलीमोठी असेल ज्यांनी गांधींच्या विचारधारेला आपली प्रेरणा मानलं व आपले अंतिम ध्येय साध्य केलीत….गांधी हे आजही हवेत असे सखोल विवेचन करण्यापेक्षा ही ‘गांधी नावाची हाडामांसांची व्यक्ती अस्तित्वात होती, यावर नवीन पिढीला विश्वासच बसणार नाही. कारण असा आदर्श पुरुष पुन्हा होणे नाही’ असे सुप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईन्सस्टाईन यांची प्रतिक्रिया खूप काही नेमक्या शब्दात कळते.त्या काळात एका वैज्ञानिकाच्या दृष्टीने गांधींचे महत्त्व विषद केले गेले.यातच ” गांधी विचारधारा ” बहुआयामी होते हे स्पष्ट होत….या सगळया महानुभावांची गाथा पारायणे केलीत तरी त्यात ठायी ठायी गांधी विचारधारेचाच स्रोत आढळतो. गांधीजीच्या एकादश (अकरा) व्रतांचा स्वीकार केला होता. ती अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन (निर्भयता), सर्वधर्म सामान्ताव्य (सर्वधर्म समभाव), स्वदेशी, स्पर्शभावना (अस्पृश्यतेचा त्याग). निर्भयता या तत्त्वाला गांधीजी आधारभूत मानत. त्यांच्यामते निर्भयतेमुळेच इतर तत्त्वांचे पालन करु शकले हे वेगळं सांगणे नको… स्वतः महात्मांनी लेखन केलेल्या तत्वज्ञान विषयक पुस्तकात त्यांच्यावरील लियो टॉलस्टॉय, जॉन रास्किन आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचा असलेला त्यांच्यावरील प्रभाव आणि स्वतः जीवनमूल्ये जाणवतात..यानंतर गांधींनी खूप काही लिहण्या ऐवजी स्वतःच्या आचरणातून व्यक्त होण्यात धन्यता मानली त्यांच्या सत्याचे प्रयोग या संक्षिप्त आत्मकथे नंतर त्यांनी माझं जीवनच “खुली किताब” असल्याचे सांगितले हे सद्याच राजकारण पाहता किती जिकरीचे होत ते ध्यानात येते.. मुळात ‘आपली काही तत्व असतील तरच आणि तरच स्वत्व टिकेल’हा निग्रह खूप काही सांगून जातो…गांधी या विषयावर कितीतरी साहित्य उपलब्ध आहे ते वाचल जावं कारण त्यातून आज वाढीस लागलेली ‘कट्टरता’ विद्वंसंक मार्गाने होतेय या अराजकतेला वेळीच आवर घालण्यात यशस्वी नाही झालो तर भविष्यात पुन्हा अंधःकार हे सत्य डावलला येत नाही… या साठी अभ्यासू राहायला हवं गांधींवर लिहली गेलेली काही पुस्तक ” गांधी विचारधारा ” समजण्यासाठी उपयुक्त होतील…”राष्ट्रपिता” जाणून घ्यायला हरकत नसावी. बुरसटलेल्या जोखडातून “जागतिक महासत्ता”होण्याचं स्वप्न नुसतं पाहून नव्हे तर सामन्यातील असामान्य अश्याचे राष्ट्रप्रेमी विचार अन त्यातील सापेक्षतः तपासून पुढं मार्गक्रमण अपेक्षित त्यात वावगं ते काय ?करण हीच ती वेळ मुळाशी घाव घालण्याची तरुणांनी फक्त आपापल्या विचारधारा स्वतंत्रपणे प्रगल्भीत करताना सारासार विचार राज्यघटनेशी सुसंगत असा करावा …सत्याचे आग्रही व्हावं इतकंच …मग करू सुरवात त्या विस्तृत शेवटाची…जागतिक महासत्ता भारताची…
माहीती संकलन लेखन
डॉ विश्वनाथ आवड व रविराज लव्हाळे अकलूज.







