खंडाळीत शेतकऱ्यामुळे वाचले जखमी कोल्ह्याचे प्राण खंडाळी (प्रतिनिधी)खंडाळी (ता. माळशिरस) येथील नागठाणा परिसरात स. म. सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र पताळे यांच्या शेतात जखमी कोल्हा असल्याचे शेतात फेरफटका मारताना निदर्शनास आले . जखमी असल्याने कोल्ह्याला हलता येत नव्हते. परंतु जवळ जाताच अंगावर येत असल्याने माजी चेअरमन राजेंद्र पताळे यांनी माळशिरस वन विभागाला कळवले. त्यांनी बारामती येथील वनविभागाच्या पथकला बोलवून जखमी कोल्ह्याला पकडले. पकडताना कोल्ह्याने एका कर्मचाऱ्याला चावा घेतला. परंतु त्यानी जखमी कोल्ह्याला पकडून पिंजऱ्यात जे्रबंद केले. माजी चेअरमन राजेंद्र पताळे यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने जखमी कोल्ह्याचे प्राण वाचले






