*सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हातसे हात जोडो अभियानाचा शुभारंभ** –
काँग्रेस पक्षाने सुरू केलेल्या “हात से हात जोडो” अभियानाच्या माध्यमातून महागाई, बेरोजगारी, विरुद्ध जनतेचा आवाज बुलंद करून, माणसाला माणूस जोडणे हाच या अभियानाचा उद्देश आहे.असे मत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते -पाटील यांनी व्यक्त केले.सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे हात से हात जोडो अभियानाच्या नियोजनासाठी बोलाविण्यात आली होती. बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रसिद्धी प्रमुख सातलिंग शटगार यांनी केले व हात से हात जोडो अभिनयाची माहिती सांगितली. यावेळी व्यासपीठावर प्रदेश सचिव पंडित सातपुते, वरिष्ठ उपाध्यक्ष अशपाक बळोरगी, भीमाशंकर जमादार, महिला अध्यक्ष शाहीनताई शेख,प्रदेश ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष सुधीर लांडे, सरचिटणीस भीमराव बाळगे, संजय चौगुले, उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण ,दत्ता गाढवे हरिभाऊ पाटील, अशोक देवकते, सुरेश हावळे, किसान काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम चव्हाण आदी उपस्थित होते. *तसेच यावेळी “हात से हात जोडो अभियानाचा शुभारंभ सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते -पाटील यांच्या हस्ते काँग्रेस भवन सोलापूर येथे करण्यात आला.* यावेळी प्रदेश सचिव पंडित सातपुते, सुदर्शन आवताडे, मोतीराम चव्हाण, सुलेमान तांबोळी, किशोर पवार, संग्राम चव्हाण ,संजय चौगुले, लक्ष्मण भोसले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी मार्गदर्शक करताना जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते -पाटील म्हणाले की सध्या जनतेसाठी आणि काँग्रेस पक्षासाठी कठिण काळ आहे. सध्याच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून जनतेचा व विरोधकांचा आवाज दाबला जातोय, संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण केला जात आहे. मा. राहूलजी गांधी यांनी “भारत जोडो” यात्रेच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक गट ,गण व वार्डात, प्रत्येक घरापर्यंत काँग्रेस पक्षाचे विचार पोहोचण्यासाठी “हात से हात जोडो” अभियान काँग्रेस पक्षाने सुरू केले असून त्याच्या माध्यमातून देशात होत असलेली महागाई, बेरोजगारी, भ्रष्ट्राचारच्या विरोधात राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी धोरणे अवलंबिले आहे .हे सरकार जनतेच्या विरोधी आहे. काँग्रेसचे ध्येय धोरणे तळागाळातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवुन माणसाला माणूस जोडण्याची जबाबदारी आपली असून प्रत्येक घरापर्यंत हे अभियान पोहोचवा असे आवाहन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले.या वेळी वरिष्ठ उपाध्यक्ष अशपाक बळोरगी,भीमाशंकर जमादार, सातलिंग शटगार, प्रदेश उपाध्यक्ष सुधीर लांडे, भीमराव बाळगे, मल्लेशी बिडवे, रमेश हसापुरे मोतीराम चव्हाण, धर्मराज पुजारी, दिलीप जाधव, प्रतापराव जगताप, सतीश पाचकुडवे, विजय साळुंके, अभिषेक कांबळे, प्रशांत साळे, सुलेमान तांबोळी, हणमंत मोरे,किशोर पवार, सुरेश शिवपूजे, सौदागर जाधव, अमर सूर्यवंशी, सुनील भोरे, हरिभाऊ पाटील, अण्णासाहेब इनामदार, अण्णासाहेब शिंदे, वसीमभाई पठाण, अभिराज शिंदे ,राहुल पाटील, मुन्ना हरणमारे, अरुणा बेंजरपे,राजेंद्र गायकवाड, गजेंद्र खरात, जहीर मणेर, डॉ दिपक नरायणकर ,कांतीलाल राऊत, बजरंग बागल, राहुल पाटील, संग्राम जाधव, कृष्णादेव वाघमोडे, रमजान नदाफ, महमूद शेख, अप्पू शेख भीमराव बंडगर अरिफ पठाण, गोविंदराव पंके, गिरीश शेटे, तानाजी जगदाळे, निवेदिता आरगडे, निलेश मांजरे, कयूमभाई बलोलखान,अनंत म्हेत्रे, रविकांत पाटील, महादेव जाधव, बिरा खरात, दाजी कोकाटे, सिद्राम पवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सातलिंग शटगार सर यांनी केले.व आभार जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष शाहीन ताई शेख यांनी मानले.▬











