• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home क्रीडा

महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न पै. सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 15, 2023
in क्रीडा
0
महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न                             पै. सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया
0
SHARES
270
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज (गणेश जाधव )पुण्यातील कोथरूडमध्ये ६५व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 14जानेवारी रोजी पार पडल्या.अनेक माजी विजेते आणि अव्वल दर्जाचे मल्ल या अटीतटीच्या स्पर्धेत उतरले होते. यामध्ये नांदेडच्या शिवराज राक्षे(मूळचा खेड पुणे) याने महाराष्ट्र केसरी या मानाच्या गदेवर नाव कोरलं. तर सोलापूरचा महेंद्र गायकवाड हा उपविजेता ठरला. दरम्यान या स्पर्धेत सर्वाधिक चर्चेत असलेला मल्ल म्हणजे सोलापूरचा सिकंदर शेख. सिकंदर शेखच यंदाचा महाराष्ट्र केसरी बनेल अशी चर्चा स्पर्धा होण्यापूर्वी सोशल मीडियात जोरदार चालू होती. पण त्याच्यासोबत सेमीफायनलमध्ये अन्याय झाला आणि तो स्पर्धेबाहेर पडला असा आरोप होत आहे.६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले होते. सेमीफायनल पर्यंत झालेल्या लढती पाहता, सिकंदर शेख हा सर्वच पैलनावानांवर वरचढ ठरत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. पण सेमीफायनलमध्ये धक्कादायक निकाल लागला . सिकंदर शेख महेंद्र गायकवाड याचेकडून पराभूत झाला.यावेळी विजयी झाल्यानंतर महेंद्र ने सिकंदर पुढे चार वेळा शद्दू ठोकला. यामुळे सोशल मीडिया वर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.याच निकालात चूक झाल्याचं बोललं जात आहे. पंचाचा निर्णय हा वादग्रस्त ठरला आहे.गादी विभागात शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगीरला अस्मान दाखवले. हे दोघेही काकासाहेब पवार आंतराष्ट्रीय कुस्ती संकुल या एकाच तालमीतील पैलवान आहेत. हर्षवर्धन सदगीरवर शिवराज राक्षेनं 8-1 असा एकतर्फी विजय मिळवला होता. माती विभागात महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख यांच्यात सामना झाला. त्यात 3 मिनिटांच्या पहिल्या फेरीत दोन्ही पैलवानांनी आक्रमक खेळी केली. यावेळी पंचांनी त्यांना कुस्ती करून गुण मिळवण्याची वॉर्निंग दिली. त्यानंतर महेंद्र गायकवाडला 1, तर सिकंदर शेखला पहिल्या फेरीत 2 गुण मिळाले. त्यानंतर महेंद्रने सिकंदरवर 5 विरुद्ध 4 अशा फरकाने विजय मिळवला.दरम्यान महेंद्र गायकवाडने लावलेली बाहेरील टांग हा डाव व्यवस्थीत झाला नव्हता सिकंदर डेन्जर पोझिशनला नव्हता. पण महेंद्रला चार गुण दिले गेले. अनेकांनी हा निर्णय चुकल्याचे बोललं आहे. जर हा निर्णय बरोबर दिला असता, तर सिकंदर शेख विजयी झाला असता असं अनेकांनी म्हंटलं आहे. पण शेवटी पंचाचा निर्णय अंतिम असतो.दरम्यान या स्पर्धेतील सिकंदर आणि महेंद्र यांच्यात झालेल्या लढतीचा व्हिडीओ सोशल मीडिया वर सध्या व्हायरल होत आहे.सिकंदर शेख ला पुण्याच्या कुस्ती कॉमेंट्री वाले व कुस्ती पंचांनी चुकीचे चार गुण देवुन हरवलं आहे. असे या व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसत आहे.पुणे वाल्यांनी कुठल्याही नियमाचे पालन केले नाही.अैक्शन रिप्ले ही मोठ्या पडद्यावर दाखवला नाही,नंतर सदगिर,राक्क्षे च्या कुस्तीला माञ तीन-तीन वेळा रिप्ले दाखवला.सिकंदर,महेंद्र च्या कुस्तीचा रिप्ले दाखवलाच नाही,जनतेला आसं वाटतं की कॉमेट्री करणारे व कुस्तीचे पंच विकले गेलेले होते.पंचाच्या आधी कॉमेट्री वाला गुण कसंका़य जाहीर करतो.सिकंदर कडुन चैलेंज करणार्याला सांगण्यात आले की झाला तुमचा चैलेंज म्हणुन हाकलुन दिले जाते.आणि सिकंदर ला दाब देवुन म्हटलं जातं की सिकंदर तु कुस्ती कर व पुढे कुस्ती खेळायला सिकंदर ला मजबुर करतात. या पुणे वाल्यांनी कुस्ती चे मैदान भरवुन काय सिध्द केले,की जो सिकंदर देशात कुस्ती खेळात धुमाकूळ घालत हिंदकेसरी सारख्या महान पहीलवानांना पाडुन आपल्या महाराष्ट्राचे नाव मोठं केले.आणि याच महाराष्ट्रात सिकंदर वर अन्याय होत आहे.आसं महाराष्ट्रातील जनता व परराज्यातुन जस्सापट्टी कमेंट करत आहेत.ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रासाठी किती खेदा ची बाब आहे.खरंच सिकंदर शेख वर अन्याय झाला आहे.त्याच्या उत्कृष्ट खेळाला न बघता त्याला कटवण्याचे काम पुणे वाल्यांनी केले आहे.आसं सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेतुन बोलले जात आहे.पंच दिनेश गुंड यांनी घाई गडबडीत 4गुण का दिले, सिकंदर च्या कोच ला का बोलू दिले नाही. असे प्रश्न विचारले जात आहेत.दरम्यान सोशल मीडिया वर या बाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.सिकंदरच्या कुस्ती निर्णयात न्यायी भुमिका घेतली गेली नाही. पंचकमिटीवर काही आक्षेप.लावले जात आहेत.खरंच सिकंदरच्या प्रतिस्पर्ध्याला चार गुण देण्याची गरज होती का? ते गुण घाईने जाहिर करण्याचा प्रयत्न दिनेश गुंड यांनी का केला? सिकंदरला टांग मारली पण तो पाठीवर पडला का? अथवा त्याचा एखादा खांदा तरी मैदानाला टेकला का? दोन्ही अँगलने कुस्तीचा रिप्ले मोठ्या स्क्रिन वर का दाखवला गेला नाही? सिकंदरच्या कोचला का तात्काळ हाकलून लावत कुस्ती सुरु केली गेली? बाकी सिकंदर हरला हा मुद्दा नाही. त्याने भारत जिंकलाय. फक्त न्यायदानात चूक होवू नये आणि ती करु ही नये. खेळात जात धर्म बघणे हे दुर्दैव आहे अशाने प्रत्येक खेळातील खेळाडूचे खचिकरण होत आहे. अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.खेळाडू कलाकार ह्यांना जात नसते परंतु काही आयोजक राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी असले जातीचे घाणेरडे राजकारण करतात हे अशोभनीय आहे.सेमीफायनलमध्ये सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यातील लढत चर्चेत आली आहे. यामध्ये सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याची भावना अनेकांनी सोशल मीडियात व्यक्त केली आहे. झाले असे कि महेंद्र गायकवाडने लावलेली बाहेरील टागं हा डाव व्यवस्थीत झाला नव्हता सिकंदर डेन्जर पोझिशनला नव्हता पण महेंद्रला चार गुण दिले गेले. अनेकांनी हा निर्णय चुकल्याचे बोललं आहे. जर हा निर्णय बरोबर दिला असता तर सिकंदर शेख विजयी झाला असता असं अनेकांनी म्हंटलं आहे. पण शेवटी पंचाचा निर्णय अंतिम असतो.सिकंदर शेख याचा कुस्ती चा झंझावती जीवनप्रवास.थक्क करणारा आहे.घरात असणाऱ्या अठराविश्‍वे दारिद्रातून कुस्तीतला प्रवास करत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. दुनियेचे ओझे पाठीवर वाहणाऱ्या आपल्या बापाच्या कष्टाचे ऋण या यशाने फेडणाऱ्या मल्लाचे नाव म्हणजे सिकंदर शेख. सध्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात रंगतेय. या स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत सिंकदरने सर्वांची मने जिंकली आहेत. महाराष्ट्रसह देशातील प्रत्येक प्रतिस्पर्धी मल्लांला त्याने आस्मान दाखवत देशातील आघाडीचा मल्ल तो बनला आहे.सिकंदर मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा. घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा. पण या वारशावर दारिद्राची गडद छाया कायमची. घरात वडील रशिद शेख पैलवानकी करायचे. निमगावच्या मगरांच्या तालमीत सरावाला असताना तालीमीची स्वच्छता करायची आणि त्या बदल्यात तालमीतील मल्ल जो खुराक देतील, तो खायचा आणि सराव करायचा. असं सुरू असतानाच वडीलांची प्रकृती खालावली म्हणून रशीद घरी परतले आणि लग्नगाठ बांधली गेली. संसाराचा गाडा हाकत असतानाच दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत कायमचीच झाली. मात्र तेंव्हाही कुस्ती सोबतीला होती. पुन्हा कुस्ती लढायला त्यांनी सुरवात केली.कुस्तीत जिंकलेल्या इनामावर जगणं सुरू होते. त्यात संसारवेलीवर हुसेन आणि सिंकदर ही दोन फुले उमलली आणि मिळणाऱ्या बक्षीसांच्या रकमेवर चार जणांचे पोट भागेनासे झाले. त्यात त्यांनी स्थानिक मार्केट यार्डात हमालीचा पर्याय निवडला. दिवसभर हमाली करायचे, घाम गाळायचा पण कुस्तीची नशा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या लहानग्या मुलांना घेऊन आखाड्यात जाऊ लागले. हमालीने थकलेलं शरीर सावरत आखाड्यात उतरून मुलांना कुस्तीचे धडे देऊ लागले. सोबतीला वस्ताद चंदु काळेंचे मार्गदर्शनही मिळत होते.सिकंदर अलीकडे चांगल्या कुस्त्या मारू लागला होता. चार पैसेही घरात येऊ लागले. त्यात सिंकदरच्या वडीलांना आजाराने गाठले आणि त्यांची हमाली थांबली. खुराकाला लागणाऱ्या पैशांची चणचण जाणवू लागली. हा प्रसंग येताच मोठा भाऊ हुसेनने आपली कुस्ती थांबवत वडीलाच्या हमालीचे ओझे आपल्या खांद्यावर घेतले. सिंकदर वडीलांचे स्वप्न उराशी बाळगुन कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत कुस्तीचे धडे गिरवू लागला. वस्ताद विश्‍वास हारूगले यांच्या मार्गदर्शनात तो एकेक डावपेच शिकु लागला. गावाकडून भावासोबत रमेश बारसकर, बाळू चौवरे यांच्याकडून आर्थिक पाठबळ मिळत होते. यातूनच सिंकदरने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, विद्यापीठस्तरीय स्पर्धा गाजवल्या. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी अनेक अनुभवी मल्लांना चितपट करण्याची किमया सिकंदरने साधली. आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर कमी वयात सिंकदर आता महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कुस्ती पटावर चमकत आहे.आपल्या वडीलांच्या, भावाच्या पाठीवर असलेले हमालीचे ओझे कमी व्हावे, घरातले दारिद्र हटावे यासाठी रक्ताचे पाणी करणारा सिकंदर अलीकडेच भारतीय लष्करात भरती झाला आहे. सैन्यदलाकडून खेळत तो अनेक मैदाने जिंकत आहे. आपला मुलगा मोठा मल्ल बनावा ही वडीलांची इच्छा त्याने पुर्ण केली आहे.आता पर्यंत देशभरात कुस्त्या लढून सिंकदरने बक्षिसांची लयलूट केली आहे. यामध्ये एक महिन्द्रा थार चारचाकी, एक जॉन डिअर ट्रक्टर, चार अल्टो कार, चोवीस बुलेट, सहा टिव्हीएस, सहा सप्लेंडर तर तब्बल चाळीस चांदी गदा त्याने आपल्या नावावर केल्या आहेत.शेवटी कोणताही खेळ म्हटले की हार -जित ही होतेच. परंतु या स्पर्धेत सिकंदर शेख याचा पराभव मात्र अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. एव्हढे मात्र निश्चित.

पै. संग्राम कांबळे. गंगावेस तालीम कोल्हापूर
पै. सिकंदर शेख यांची प्रतिक्रिया
🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ
क्रीडा

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

June 27, 2026
सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!*   *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त*                              -*पैलवान संग्राम कांबळे.*
क्रीडा

सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!* *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त* -*पैलवान संग्राम कांबळे.*

April 27, 2026
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
क्रीडा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन

March 9, 2026
टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते
क्रीडा

टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते

March 8, 2026
क्रीडा

अकलूजमध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणरविवारी सायंकाळी ५ वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात भारत-न्यूझीलंड लढतीचा थरार

March 7, 2026
विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*
क्रीडा

विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*

March 2, 2026
Next Post
सांगोला येथील लॉजवर बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायाचा भंडाफोड;

सांगोला येथील लॉजवर बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायाचा भंडाफोड;

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In