अंबादास (अण्णा)ओरसे यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी चे जिल्हाउपाध्यक्ष पदी फेरनिवड.
अकलूज (प्रतिनिधी ):राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनअंबादास(आण्णा) ओरसे यांची फेर निवड करण्यात आली असल्याचे पत्र सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी प्रसिद्ध केले आहे.
अवघ्या एक आठवड्या पूर्वी अकलूजमध्ये राहत असलेले अंबादास ओरसे यांची निवड जिल्हाध्यक्ष बळीराम काका यांनी जाहीर केली होती,निवडीनंतर ओरसे यांनी अकलूजमध्ये प्रत्येक चौकात शुभेच्छा बॅनर लावले होते.त्यामुळे अकलूजमध्ये येणाऱ्या प्रत्येक लोकांना लावलेले डिजिटल पहायला मिळत आहेत,मात्र त्यांची निवड अचानक रद्द झाल्याचे पत्र व्हायरल झाले होते .सदर पत्र व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले होते. दिनांक 14 जानेवारी रोजी अंबादास (अण्णा)यांची पुनश्च जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी दिले आहे. काही विघ्न संतोषी कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार करून त्यांची निवड रद्द केली होती. पुनश्च निवडीचे पत्र मिळाल्यानंतर त्यांचे कार्यकर्त्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक व न्याय विभाग महाराष्ट्र राज्याचे अशोक दादा गायकवाड, सचिव तुकाराम भाऊ साळुंखे पाटील, युवा नेते राहुल ढेरे पाटील. आदी मान्यवर उपस्थित होते.








