*अनुसूचित जातीमधून खोटा जातीचा दाखला काढणारे उत्तम जानकर यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार:मातंग समाजातील पदाधिकारी*
माळशिरस तालुक्यातील समस्त मातंग समाजाच्या विचारधारेच्या वतीने अकलूज येथे मीटिंग पार पडली.मागील काही वर्षांमध्ये अनुसूचित जातीचे खोटे कागदपत्रे काढून अनुसूचित जातीमध्ये अवैधरित्या घुसखोरी करणाऱ्या उत्तम जानकर यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी,याकरता कायदेशीर लढा देण्यासाठी मातंग समाजातील बांधवांनी विचारविनिमय करण्यात आला.काही समाजबांधवांच्या भेटीघेण्यात आल्या. माळशिरस तालुक्यामध्ये आमदारकीचे अनुसूचित जातीचे आरक्षण आहे.खोट्या जातीच्या दाखल्यावर गेली दोन पंचवार्षिक आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या गद्दाराला येणारी आमदारकीची निवडणूक अनुसूचित जातीमधून न लढवून देण्याचा व एस सी कोट्यामध्ये घुसखोरी करणाऱ्या विरोधात कायदेशीर लढा उभा करून समस्त मातंग समाज पाठपुरावा करणार आहे.लवकरच अनुसूचित जातीमधील सर्व पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन कायदेशीर व्यापक रूप धारण करणार आहोत. यावेळी सुधीरभाऊ साठे, नानासाहेब रणदिवे,सज्जन भाऊ लोखंडे,महेश मोहिते,मकरंद साठे बबन रणदिवे, सागर रणदिवे, किरण रास्ते ,माऊली खिलारे, सागर खिलारेअधिकारीकर्ते उपस्थित होती व भेटीगाठीअधिकारीकर्ते उपस्थित होते व भेटीगाठी घेऊन संबंधित चर्चा करण्यात आली.








