मेफेन टेरेफिन सल्फेट या इंजेक्शनची बेकायदेशीर पैलवानांना विक्री करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील चार मेडिकल दुकानांवर सोलापूर जिल्हा अन्न व औषध प्रशासना ची कारवाई.धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली होती तक्रार.
अकलूज (प्रतिनिधी ): सोलापूर जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात कारवाई करत मेफेन टेरेफिन सल्फेट या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या चार मेडिकल दुकानांवर कारवाई केली आहे. कुस्ती स्पर्धा तोंडावर असताना कारवाई झाल्याने पैलवान व जिममधील बॉडी बिल्डरांवर संशय व्यक केला जात आहे.अकलूज येथील भाजपा चे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी याबाबत सोलापूर अन्न व औषध प्रशासन विभागाकडे 19नोव्हेंबर रोजी लेखी तक्रार दिल्याने ड्रग इन्स्पेक्टर सचिन कांबळे आणि अरुण सखाराम गोडसे यांनी कारवाई केली आहे. अकलूज येथील दीपक मेडिकल प्रो -दिपक विजयकुमार फडे,, वेळापूर येथील राजलक्ष्मी मेडिकल प्रो -मनोज पोपट जाधव , श्रीपूर येथील ओमसाई मेडिकल, प्रो -नाना बाळू बनसोडे,वेळापूर येथील प्रेमल मेडिकल, प्रो -रमेश बाबासाहेब नाईक,या चार मेडिकल दुकानात मेफेन टेरेफिन सल्फेट इंजेक्शन आढळले आहेत. हे इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा प्रिस्क्रीप्शन शिवाय विकता येत नाही. तरीही मेफेन टेरेफिन सल्फेट इंजेक्शनची विक्री करण्यात आली आहे. तसेच नियमानुसार याचा रिकोर्ड ठेवणे गरजेचे आहे. या तिन्ही मेडिकल दुकानांत उत्तेजक इंजेक्शन आढळले आहे. या तिन्ही मेडिकल दुकानधारकांविरोधात अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याची माहिती अन्न औषध प्रशासन विभागाने दिली आहे.कुस्ती स्पर्धा तोंडावर असताना कारवाईसर्व इंजेक्शन तालमीत कुस्ती करणाऱ्या पैलवानांना व जिममध्ये बॉडी बिल्डर यांना विकण्यात आले आहेत. सोलापूरच्या अन्न आणि औषध प्रशसनाने ५ डिसेंबर २०२२ माळशिरस तालुक्यातील या तीन ही मेडिकल्सची तपासणी केली होती. अवैध पद्धतीने मेफेन टेरेमिन सल्फेट इंजेक्शन विकल्याने या औषध विक्रेत्यांना खुलासा सादर करण्याच्या नोटीस देण्यात आल्या होत्या. विक्रेत्यांकडून आलेला खुलासा असमाधानकारक असल्याने २१ डिसेंबर २०२२ रोजी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यानंतर ३० डिसेंबर २०२२ रोजी या तिन्ही मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला आहे, असे अन्न आणि औषध प्रशासनाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. मात्र औषध विक्रेत्यांनी आपल्या खुलाशात पैलवांनाना हे औषध विकले नसल्याचे म्हटले आहे. आता हे इंजेक्शन कुणाला विकण्यात आले याची माहिती पोलीस तपासातून बाहेर येईल.
१) दीपक मेडिकल – ८००० हून अधिक इंजेक्शन खरेदी केल्या२) राजलक्ष्मी मेडिकल- १०० हून अधिक इंजेक्शन खरेदी केल्या३) ओमसाई मेडिकल- ५०० हून अधिक इंजेक्शन खरेदी केल्या4)प्रेमल मेडिकल अकलूज, वेळापूर, श्रीपूर येथील आणखीन मेडिकलची तपासणी होणार आहे. माळशिरस तालुक्यातील वेगवेगळ्या मेडिकलची तपासणी करण्यात येणार आहे. सोलापुरात हे इंजेक्शन कोणकोणत्या मेडिकलमध्ये उपलब्ध आहे, त्याबद्दल सर्व माहिती घेतली जाणार आहे. कुठे आणि कुणाला विकले याची देखील पडताळणी होणार आहे, अशी माहिती ड्रग इन्स्पेक्टर सचिन कांबळे यांनी दिली.
कुठे होतो मेफेन टेरेमिन सल्फेटचा वापर?
ऑपरेशन थिएटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर सर्जरी करताना, भूल देताना मेफेन टेरेमिन सल्फेट इंजेक्शनचा वापर करतात. पण जीममधील बॉडी बिल्डर व तालमीत जोर बैठका मारणारे देखील सप्लिमेंट म्हणून याचा उपयोग करत असल्याची धक्कादायक माहिती एका निवेदनाद्वारे समोर आली आहे. या इंजेक्शनचा डोस घेतल्याने रक्तदाब वाढतो परिणामी अधिक मेहनत घेता येते. पण याचा अधिक वापर झाल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतो, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कांबळे व अरुण गोडसे यांनी दिली आहे.दरम्यान दिनांक 01/04/2020 ते दिनांक 05/12/2022 या कालावधीत सदर गुन्हा घडल्याची फिर्याद 04/01/2023 रोजी अकलूज पोलीस ठाणेत दाखल करण्यात आली आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील आरोपींनी संगणमत करुन Napromine Injection या औषधाची विक्री ही डॉक्टरांच्या चिठ्ठीद्वारेच विक्री करणे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार बंधणकारक असताना सदर औषध डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय, विना विक्री बिलाने, औषधाचा मुळ गुणधर्म माहित नसताना व्यायाम करणा-या व्यक्तींना बॉडी बिल्डींग साठी गैरवापर करण्यासाठी विक्री केलीे. सदर औषधाच्या वापरामुळे ग्राहकांच्या स्वास्थास / जिवीतास हानी होण्याची शक्यता आहे. सदर औषधे शरीरयष्टीसाठी गैरवापर केल्याने सेवन करणा-या व्यक्तीच्या आरोग्यास धोका / इजा होवू शकते. सदर औषध केमिकल असुन डॉक्टरांच्या सल्याशिवाय वापरल्यास त्याच्यामुळे त्याचे विषारी द्रव्ये म्हणुन दुष्परिणाम होतात व सदर औषध घेणा-या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकतात हे माहित असताना देखील त्यांनी औषधांची विक्री केली आहे म्हणून सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे व अकलूज पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शन खाली पुढील तपास स. पो. नि. गणेश चौधरी हे करीत आहेत.







