*दिवाणी व फौजदारी न्यायीक प्रकरण ई फायलिंग द्वारे अनिवार्य करताना सोयी सुविधा पुरावा -कोल्हापूर जिल्हा बार असो मधील सभेत वकिलांची मागणी*
अकलूज दि.6 (केदार लोहकरे यांजकडून)मा.उच्च न्यायालय,मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक तपासणी दि.1/3/2023.दि 3/1/2023 व जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर यांचेकडील परिपत्रक क्रमांक 01/2023 नुसार दिवाणी व फौजदारी न्यायीक प्रकरणे ई फायलिंग द्वारे दाखल करणे अनिवार्य करण्यात आले आहे.तरी याबाबत विचारविनिमय करणेकरीता कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने विशेष सर्वसाधारण सभा आज शुक्रवार दिनांक 6/1/2023 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा व सत्र न्यायालय न्यायसंकुल राजर्षीं शाहू छत्रपती हॉल,कसबा बावडा कोल्हापूर येथे आयोजित केली होती.त्यावेळी वकिलांनी आपली मत व्यक्त केले यावेळी सचिव ॳॅड.विजय ताटे-देशमुख यांनी सभे पुढील विषय व प्राप्त परिपत्रक याचे प्रथम वाचन केले.यावेळी अध्यक्ष अँड गिरीश खडके, बार कौन्सिल माजी अध्यक्ष महादेवराव आडगुळे,अँड.विजयसिंह पाटील, अँड.प्रकाश मोरे,अँड.अशोक पाटील,अँड.अजित मोहिते,अँड.रणजित गावडे,अँड.किरण पाटील,अँड.अजित हुक्केरी,अँड.बुधले,अँड.सतिशखोतलांडे,अँड.संदीप कुरणे यांनी ई फायलिंग अनिवार्य परिपत्रक बाबत बोलताना म्हणाले की,तालुका व जिल्हा न्यायालयात ई फायलिंग बाबत सोयी सिविधा नाहीत,ई फायलिंग सक्ती न करतात त्याची अंमलबजावणी टप्या टप्याने करावी,ई फायलिंगचा खर्च हा पक्षकारा वरती पडणार आहे याचा विचार व्हावा, ई फायलिंग बरोबर मॅन्युअल फायलिंग देखील ठेवावे. तालुका ठिकाणी नेट वाय फाय सुविधा नाहीत,लाईट लोड शेडींग आहे त्यामुळे अडचणीस सामोरे जावे लागणार आहे.अशा सूचना व मते व्यक्त करण्यात आली. सदर सूचना व मतांचा आदर करून ठराव करून सदर सूचना मा.उच्च न्यायालय मुंबई यांना कळविण्यात येतील असे अध्यक्ष अँड गिरीश खडके यांनी सांगितले. यावेळी बार असोसिएशनचे पदाधिकारी उपाध्यक्ष अँड.सुधीर चव्हाण,अँड.संकेत सावर्डेकर,अँड.तृप्ती नलवडे,अँड.सुशांत चेंडके,अँड.विक्रम पाटील,सर्व माजी अध्यक्ष,वकील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सभेचे आभार प्रदर्शन अँड.सुधीर चव्हाण यांनी केले.







