*गरजूंसाठी पुन्हा एकदा ‘आरोग्य दूत’ आ. रामभाऊ सातपुते धावून गेले! **नातेपुते मधील राधिका भरते हिचे ३.५० लाख रुपयाचे ऑपरेशन मोफत*
माळशिरस येथील मोल मजुरी करणाऱ्या भरते कुटुंबातील राधिका ही माऊली गेली २५ वर्षे ब्रेन ट्युमर या जीवघेण्या आजाराशी झुंज देतेय. या आजारपणातून बाहेर येण्याकरिता ३.५ लाख रुपये भरून शस्त्रक्रिया करावी लागणार होती. ही गोष्ट रामभाऊ सातपुते यांना समजताच त्यांनी नेहमीप्रमाणे आपली सेवाभावी वृत्ती दाखवून दिली. त्यांनी तातडीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाशी संपर्क साधला. त्यांना राधिकाच्या आजारपणाविषयी समजावून सांगितले, तसेच तिच्या घरच्या आर्थिक परिस्थितीविषयी कल्पना दिली. रामभाऊ सातपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात राधिकावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. आज देवाच्या कृपेने व डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे राधिका ठणठणीत बरी झालेली आहे. माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने आणि लोकप्रतिनिधी म्हणून राम सातपुते नेहमीच त्यांचं कर्तव्य निभावत असतात. साक्षात देव कोणी पाहिला नाही, पण माणसातला देव पाहायचा असेल तर तो राम सातपुतेंमध्ये दिसतो. कार्यक्षम, आरोग्य दूत व जनतेच्या सेवेपायी सदैव तत्पर असे रामभाऊ सातपुते माळशिरसचे लोकप्रिय आमदार का आहेत, हे ते स्वतः त्यांच्या कार्यातून नेहमी दाखवून देतात!







