सोलापूर /भैय्या खिलारे-शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी सुरेश जम्मा यांची निवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा कक्ष प्रमुख व डॉ .श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या समनव्यक पदी त्याची निवड करण्यात आली. सुरज जम्मा हे मागील सात वर्षापासून सामाजिक काम करतात. रुग्णावर तातडीने उपचार शस्त्र कियेसाठी निधी उपलब्ध करून देणे दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार शस्त्रक्रिया करून देण्यासाठी ते प्रयत्न शिल असतात. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोर गरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालयात राखीव खाटा उपलब्ध करून देणे. मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रकिया करण्या संदर्भात मदत तसेच महात्मा फुले जण आरोग्य योजना अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांना शस्त्रकिया मोफत करणे पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी तसेच इतर ट्रस्टच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी यावा यासाठी निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल सुरज जम्मा यांचे अभिनंदन होत आहे.







