“शिवरत्नच्या” वतीने सोलापूर सोहोदय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी; सोलापूर सोहोदय कॉम्प्लेक्स म्हणजेच सोलापूर जिल्ह्य़ातील सीबीएसई शाळांच्या ॲथलॅटीक्स व ट्रॅक & फिल्डच्या आंतरशालेय स्पर्धाचे आयोजन अकलूज येथे करण्यात आले असून यंदाचे संयोजकपद शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न सीबीएसई स्कूल यांच्याकडे आहे.
दि.१७ डिसेंबर रोजी विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे स्पर्धा पार पडणार असून या स्पर्धेत जिल्ह्यातील १० सीबीएसई शाळा सहभागी होणार आहेत अशी माहीती शिवरत्न सीबीएसई स्कूलचे प्रिन्सिपल बिनो पाऊलस व अल्बर्ट थरकन यांनी दिली.
सोलापूर सोहोदय कॉम्प्लेक्सच्या आंतरशालेय ॲथलॅटीक व ट्रॅक&फिल्डच्या स्पर्धेचे आयोजन शिवरत्न शिक्षण संचलित शिवरत्न सीबीएसई शाळेकडे असून स्पर्धेचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते होणार आहे तसेच संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील उपाध्यक्ष शितलदेवी मोहिते-पाटील,सोलापूर सोहोदय कॉम्प्लेक्सचे प्रमुख जयश्री भोसले,सुप्रिया भागिरथ, एस.एन.दास यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
चौकट
सोलापूर जिल्ह्यातील सीबीएसई शाळांच्या सोलापूर सोहोदय कॉम्प्लेक्सच्या आंतरशालेय ॲथलॅटीक स्पर्धेचे आयोजन करताना आनंद होत आहे.अभ्यासाइतकेच जीवनात व्यायाम व खेळ यांनाही महत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाबरोबरच मुलांचा, शारीरिक विकासही झाला पाहिजे. व्यायाम, खेळ शारीरिक विकास करतात तर शिक्षण, चिंतन, मननामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक विकास होतो, विद्यार्थ्यांनी खेळा व अभ्यासाचे संतुलन ठेवत सर्वांगीण विकास केला पाहीजे तसेच स्पर्धेतील सर्व सहभागी खेळाडूंना माझ्या शुभेच्छा आहेत.
शितलदेवी मोहिते-पाटील,
उपाध्यक्ष शिवरत्न शिक्षण संस्था








