तुळजापूर येथे १७ डिसेंबर रोजी दुसरे राज्यस्तरीय बालाघाट साहित्य संमेलन
निमंत्रक पदी योगेश केदार यांची नियुक्ती
तुळजापूर : शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात १७ डिसेंबर रोजी दुसरे राज्यस्तरीय बालाघाट साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे यांनी तुळजापूर येथे आयोजित बैठकीत दिली.अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे संमेलन तुळजापूरला आयोजित करण्याचा निर्णय सर्वांनूमते घेण्यात आला. कळंब येथे पहिले साहित्य संमेलन झालेले असून यावर्षी तुळजापूर येथे दुसरे साहित्य संमेलन १७ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात हे साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनात उद्घाटन सत्र, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन असे एकदिवसीय भरगच्च कार्यक्रम पार पडणार आहेत.या संमेलन चे अध्यक्ष प्रा. शरद गोरे स्वागत अध्यक्ष तुळजापूर चे आमदार राणाजगजीतसिंह पाटील, तर उदघाटक माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, तर निमंत्रक भारतीय अन्न महामंडळ सल्लागार समिती चे सदस्य योगेश केदार असल्याचे ज्ञानेश्वर पतंगे यांनी सांगितले.तसेच प्रमुख अतिथी म्हणून आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत, उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर हे उपस्थित राहणार आहेत.यावेळी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर, तुळजापूर तालुकाध्यक्ष अनिल आगलावे उपस्थित होते.








