पुरोगामी महाराष्ट्रात क्रांती घडविण्यासाठी लोकक्रांती महासंघाची स्थापना :- सतीश आडगळे
पुरोगामी महाराष्ट्रात लोकांमध्ये क्रांती घडली पाहिजे हा आशेचा किरण घेऊन लोकक्रांती महासंघ या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढा देण्यासाठी तसेच सर्वसामान्यांवर होणार अन्याय रोखण्यासाठी तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून तो मार्गी लागला पाहिजे हे उद्दिष्ट घेऊन संस्थापक अध्यक्ष सतीश अडगळे यांनी लोकक्रांती महासंघ या सामाजिक संघटनेची स्थापना केली आहे.लोकक्रांती महासंघ ही संघटना शिव, शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचार धारेने चालणारी आहे यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना स्थान देणार असल्याचे व तळागाळातील दिनदलित बहुजनांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष सतीश आडगळे यांनी सांगितले यावेळी साई आडगळे,अतुल माने पाटील पंढरीनाथ थोरात,चेतन साठे, अविनाश लोखंडे,आदित्य काकडे, धनराज आडगळे आदी उपस्थित होते








