वटपळी परिसरात दिसलेला प्राणी बिबटया नसून तरसच.
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील वटपळी परिसरात तरस दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.माळशिरस वरून निघालेल्या वाहनधारकाला हा प्राणी आडवा गेल्याने त्याने वटपळी येथील नागरिकांनी सतर्क राहावे असे सांगितले आहे.दरम्यान यासंदर्भात माळशिरस येथील वनविभाग चे अधिकारी दयानंद कोकरे यांना संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, वनविभाग चे कर्मचारी सदर प्राणी कोणता आहे. हे पाहण्यासाठी पथक पाठविले असून, ते त्या प्राण्याचा मागोवा घेत आहेत. परिसरातील नागरिकांनी कोणत्याही अफवा वर विश्वास न ठेवता, घाबरून जाऊ नये. व सतर्क राहून काळजी घ्यावी. असे सांगितले.दरम्यान बागेचीवाडी येथील पोलीस पाटील शंकरराव बागडे यांनी बागेचीवाडी तील व इतर आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन केले असून वटपळी परिसरामध्ये बिबट्या सदृश्य अथवा तरस प्राणी आढळल्या कारणाने सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी. असे सांगितले आहे.






