सह्याद्री पुत्र सोमनाथ शिंदे काळाच्या पडद्याआड; ट्रेकिंग करताना 200 फुटांवरून कोसळून दुर्दैवी मृत्यू सह्याद्री पुत्राचा सह्याद्री च्या कुशीतच मृत्यू
पुणे (प्रतिनिधी )महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ले लिलया सर करणारे ट्रेकिंग स्टार सोमनाथ शिंदे यांचे दुर्दैवी निधन झालं आहे. दिनांक ११/१२/२०२२ रोजी तैल बैला हा ट्रेक करताना दोर लावून खाली येत असताना अचानकपणे दोर तुटल्याने ते तब्बल २०० फुटांवरून कोसळले आणि यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.खरे तर सोमनाथ शिंदे हे एक अस व्यक्तीमत्व होत ज्यांनी क्लाईमींग रॅपलिंग ट्रेक करत फक्त येण्या जाण्याच गाडीभाड घेऊन अनेकांना सह्याद्रीची ओळख करुन दिली. ज्यांना ट्रेक करायची इच्छा असते पण पैश्याच्या अभावी आपली इच्छा मारावी लागते अशा शेकडो- हजारो ट्रेकर्स ना ट्रेक ला घेऊन जाऊन त्यांची इच्छा पुर्ण केली, अश्यांच हक्काच व्यासपीठ म्हणजे सोमनाथ शिंदे. एवढच नाही एखाद्याने ट्रेक अरेंज केला त्यात त्याना सोमनाथ शिंदे यांची मदत लागत असली तर कोणत्याही प्रकारे पैसे घेतले नाहीत. स्वखर्चाने मदत करणारा असा हा निस्वार्थि विचारांचा शिवशंभु छत्रपतींचा मावळा आज काळाच्या पडद्याआड गेला.कधीच कोणा बद्दल वाईट न बोलणारा वाईट विचार न करणारा निखळ, निर्मळ, स्वच्छ मनाचा तरुण म्हणून त्यांची मित्र परिवारात ओळख होती. सोमनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर जगले. या सोमनाथ शिंदेचा शेवट या सह्याद्रीच्या कुशीतच होईल. मराठ्याची आवलाद आहे मरणाला भीत नाही. आपला सह्याद्रीच आपल सर्वस्व आहे. त्याच्या कुशीत मरण आल तर भाग्यवंत असेल मी हे त्यांचं एकेकाळचे वाक्य आज दुर्दैवाने खरे ठरले असेच म्हणावं लागेल.पुण्यातील मुळशी तालुक्यातील तैलबैला गडावर ट्रेक करताना रोप तुटल्याने २०० फूट खाली कोसळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कात्रज येथे राहणारा २५ वर्षीय सोमनाथ बळीराम शिंदे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. ट्रेक करताना रोप तुटला अन्…२५ वर्षीय सोमनाथ बळीराम शिंदे हा पुण्यातील कात्रज येथे राहत होता. सोमनाथ हा शनिवारी त्याच्या नऊ मित्रांसह गडावर ट्रेकसाठी गेले होते रविवारी सकाळी सोमनाथ हा गडावर पुढे जाऊन रोप, दोर बांधण्याचे काम करीत होता. त्याच्या पाठीमागून दोरीच्या साहाय्याने उर्वरीत तरुण गडावर चढाई करणार होते.रविवारी सकाळी साडे नऊ वाजता ट्रेकिंगचा दोर तुटल्याने सोमनाथ थेट १०० फूट खाली कोसळला. त्यानंतर तेथून पुन्हा १०० फूट आणखी खाली कोसळला. त्यामुळे २०० फूट खाली कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झालानेमकं काय घडलं?पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ आणि त्याच्या मित्रांचा ग्रुप तैलबैल येथे ट्रेकिंगसाठी आला होता. रात्री गावात मुक्काम केल्यानंतर पहाटे त्यांनी ट्रेकला सुरुवात केली. मात्र, सोमनाथ योग्य उपकरणांच्या अभावामुळे खाली पडला. २०० फूट खाली पडल्यामुळे सोमनाथला गंभीर मार लागला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही माहिती समजताच लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रेस्कू करत सोमनाथ शिंदे याचा मृतदेह बाहेर काढला.दरम्यान, सोमनाथचा जागीच मृत्यू झाल्याने त्याच्या मित्रांमध्ये एकच खळबळ उडाली. सोमनाथच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर सोमनाथच्या मृत्यूने कात्रज परिसरात शोककळा पसरली आहे.








