बंडु यादव याचेविरुद्ध गुन्हा दाखल
अकलूज/प्रतिनिधी:सामाजिक कार्यकर्ते किरण भांगे(चाकोरे) यांची गाडी थांबवून धमकी दिल्याबद्दल बंडू पांडुरंग यादव,रा.सेक्शन 15, जांभूड याचेवर माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि.1860 चे कलम 506 व 34, गु.र.नं: 742/2022 हा अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत हकीकत अशी की,किरण भांगे हे अकलूजवरून चाकोरेकडे जात असताना भिताडेवस्ती या ठिकाणी बंडू यादव व त्याचा एक अनोळखी सहकारी यांनी किरण भांगे यांची गाडी अडवुन “तू आमचा नाद करू नकोस.तुला बघुन घेतो”असे म्हणत धमकी दिली.तसेच यादव,शेळके,कदम,सावंत,चव्हाण यांच्या हस्ते-परहस्ते जीवितास धोका असल्याचा अर्ज पोलीस प्रशासनाकडे दिला असल्याची माहिती किरण भांगे यांनी दिली.







Nice job