मच्छिंद्र सकटेचा अकलुज येथे निषेध
प्रतिनिधी – गेल्या १५/वर्षांपूर्वी दलित महासंघ ही गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कांसाठी लढणारी एकमेव लढाऊ आणी जहाल संघटना होती या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर समाजाच्या जीवावर दलित महासंघ संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांनी बहुजन समता पार्टी हा राजकीय पक्ष स्थापन केला संघटनेत आणी बहुजन समता पार्टी या पक्षात काम करणारे आजी-माजी सर्वच पदाधिकारी जहाल आणि लढाऊ होते म्हणून ही पक्ष संघटना टिकली परंतु संस्थापकांनी कार्यकर्ता मोठा होतोय म्हटले की त्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम केले. म्हणून आज चांगल्या विचारांची लोकं मच्छिंद्र सकटे यांना सोडून स्वतःचे अस्तित्व निर्माण करू लागले आहेत. प्रामाणिक कार्यकर्त्यात संस्थापक अध्यक्षांनी दरी निर्माण केली कार्यकर्ता मोठा झालेला त्यांना कधी बघवला नाही म्हणून कपटनितिने कट कारस्थान रचले कार्यकर्त्यांनी मोठा चांगला कार्यक्रम घेतला तर जाणीवपूर्वक उपस्थित न राहणे कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर ज्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम घेतला त्या कार्यकर्त्याकडून जाण्या येण्याचा पेट्रोल खर्च जेवणाचा खर्च घेऊन उलट कार्यकर्ता धुळीस मिळवला माळेवाडी बोरगाव प्रकरणात सर्वात शेवटी येऊन पत्रकार परिषद अकलुज येथे घेऊन स्टंटबाजी केली. हे सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे कार्यकर्ता त्यांच्या पासून दुरावला जाऊ लागला चांगले कार्यक्रम घेणाऱ्याच्या कधीही पाठीवर शाब्बासकीची थाप न देणारे संस्थापक अध्यक्ष सकटे यांना आत्ता एकटं वाटू लागले त्यामुळे आता कुठेतरी काही मिळेल या आशेने स्वार्थासाठी Rss/भाजप विचारांचा असनारा शिंदे गट जवळ करून काय स्वतः साठी मिळतय का हे पाहून त्यांनी शिंदे गटात जाहिर प्रवेश केला शिव, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, यांच्या विचारांनी संघटना पक्ष उभा केला स्वतःची संघटना आणि पक्ष असून सुद्धा कोणत्याही कार्यकर्त्यांना मातंग समाजाला विचारात न घेता शिंदे गटात प्रवेश केला ही सकटे साठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांना बाजूला सारून स्वतःच अस्तित्व नसणाऱ्या शिंदे गटात प्रवेश केला म्हणून सर्वं मातंग समाज कार्यकर्ते पदाधिकारी सकटे यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. मच्छिंद्र सकटे यांनी शिंदे गटात प्रवेश केला म्हणजे त्यांना खोके मिळणार नाहीत उलटं पायांवर धोंडा पाडुन घेतला. शिंदे गटाच अस्तित्व ज्यास्त काळ टिकणार नाही सद्या ठाकरे गटात रोज बड्या नेत्यांच्या प्रवेश होत आहे ठाकरे गट राष्ट्रवादी, काँग्रेस यांची महा विकास आघाडी पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांना चालना देणारी आहे. लवकरच सोलापूर जिल्ह्यातील दलित महासंघ बहुजन समता पार्टी सकटे यांना बाहेर करतील सकटे यांच्याकडे आत्ता कार्यकर्ता उरलेला नाही. हे त्यांच्या ही लक्षात आले म्हणूनच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाच अस्तित्व संपताच सकटे यांना चुकिच्या निर्णयाचा पश्चाताप होऊन शिंदे गटात प्रवेश करण्यापेक्षा एखाद्या बचत गटात प्रवेश केला असता तर बरं झालं असतं असं वाटू नये. शिव, फुले, शाहू, आंबेडकर, भाऊ साठे यांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांना गद्दारी करणाऱ्या विनाशकालीन विकृत बुद्धीच्या सकटेचा माळसिरस तालुका दलित महासंघाच्या वतीने जाहीर निषेध असो अशा आशयाचे पत्रक दलित महासंघाचे माळसिरस तालुका अध्यक्ष व नेते बच्चन साठे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.







