*बास्केटबॉल संघात अकलूज येथील ‘शिवरत्न’ चे तीन खेळाडू*
अकलूज: औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दि.३ ते ७ डिसेंबर दरम्यान आयोजित केलेल्या चोवीसाव्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघामध्ये येथील शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. ज्योतिरादित्य दावणे, प्रसाद बारवे व शुभम सूळ या तीन खेळाडूंची विद्यापीठ संघात वर्णी लागली आहे. संघाचे सराव शिबिर तेवीस नोव्हेंबर पासून अकलूज येथील विजयसिंह क्रीडा संकुलात प्राध्यापक डॉ. महेश ढेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शिवरत्न नॉलेज सिटी परिसरातील ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कंप्युटर टेक्नॉलॉजी चे उपप्राचार्य व क्रीडा संचालक डॉ. महेश ढेंबरे यांच्या व्यवस्थापनाखाली विद्यापिठाचा संघ औरंगाबादकडे रवाना झाला. अकलूजच्या खेळाडूंच्या निवडीबद्दल शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते- पाटील, उपाध्यक्षा सौ. शितलदेवी मोहिते -पाटील, सचिव धर्मराज दगडे, महाविद्यालय विकास समीतीने अध्यक्ष तानाजी काशीद, पालक संचालक डॉ. विश्वनाथ आवाड, प्रशासनाधिकारी अश्रफ शेख, प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार, महाविद्यालय विकास समीतीचे सर्व सदस्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.










