दिनांक २५ नोव्हेंबर २०२२नवी मुंबई / दिपाली पारसकरआर्थिक विश्लेषण तज्ञ व बांधकाम, व्यापार विक्री व सेवा यातील संशोधनाबद्दल उद्योजक इंद्रजीत येडेकर यांना दादासाहेब फाळके आयकॉन चा आंत्रप्रन्योर ऑफ द इयर 2022 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.नवी मुंबई येथील उद्योजक व क्रिवी कॅपिटल या कंपनीचे संस्थापक चेअरमन इंद्रजीत शंकरराव येडेकर यांना देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा दादासाहेब फाळके आयकॉन चा आंत्रप्रन्योर ऑफ द इयर 2022 या पुरस्काराने मुंबई येथे एका शानदार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म नॅशनलचे हे चौथे वर्ष होते. हा पुरस्कार सोहळा कल्याणजी जना ट्रस्टी व फाउंडर चेअरमन डीपीआयएएफ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. डी पी आय ए एफ च्या नॅशनल ग्लोबल प्रेसिडेंट डॉ. अंकिता जना व डी पी आय ए एफ चे नॅशनल प्रेसिडेंट भैरू जैन हे सहयोजक होते. कल्याणजी जना युथ फाउंडेशन, डी पी आय ए एफ, रोटी अँड कपडा बँक, के जे टॉकीज, ओटो प्लॅटफॉर्म यांच्या वतीने प्रस्तुत करण्यात आला.या कार्यक्रमात उद्योजक, क्रीडा, सामाजिक, मराठी व हिंदी चित्रपटातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.







