*राज्यघटनेने एकात्मता निर्माण केली.डॉ.दत्तात्रय बागडे.* संग्रामनगर दि.२६ (केदार लोहकरे यांजकडून)अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय येथे 26 नोव्हेंबर संविधान दिन सरनामा वाचन व जनजागृती अभियानात प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले कि,धर्म,जात,भाषा,प्रादेशिकता अशी विविधता असलेल्या देशाला राज्यघटनेने बांधून ठेवले आहे. घटनकर्त्यांनी जगातील सर्वात चांगली घटना देशाला देण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सरनामा वाचन करताना डॉ.विश्वनाथ आवड यांनी भारत नावाचा प्रदेश राज्यघटनेनंतर देश झाला हि भुमीका मांडली.आम्ही भारतीय जनता हा प्रवास सहज साध्य झालेला नाही त्यातुन सामाजीक न्याय निर्माण करण्यासाठी सरनाम्यात प्रयत्न केलेले आहेत.राज्यघटनेच्या आगोदर I ( आय )असलेला देश We ( वुई) झाला.वर्षानुवर्षे देवधर्माच्या सात बा-यांवर असलेला देश माणसाच्या सात बा-यावर आला म्हणून उद्देशपत्रिकेतील “आम्ही भारतीय जनता” हे वाक्य अतिशय महत्वाचे आहे. राज्यघटने़चे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना 2 वर्षे 11 महिने व 18 दिवस घटना निर्मितीसाठी लागले. 26 नोव्हेंबर 1949 यादिवशी राज्यघटनेचे तिन्ही वाचन पुर्ण झाले व राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांचे सहिने राज्यघटना मजुंर करण्यात आली. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेसह 26 / 11 च्या हल्ल्यात शहिद झालेल्या शहीदांचे प्रतिमांचे पुजन करून त्यांचे स्मरण करण्यात आले.राज्यघटनेचा सर्व भारतीयांनी सन्मान करुन प्रास्ताविकामधील मुल्यांना अंगी बाळगावे असेही अवाहन करण्यात आले. संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे निमीत्त साधून वेळापुर ऐतिहासीक वारसा प्रोजेक्ट रिपोर्ट पुरस्काराचे वितरण करण्यात आले त्यामध्ये हितेश पूंज व प्रतिक फुले यांचा प्रथम क्रमांक आला होता त्यांना प्रमाणपत्र देणेत आले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ जनार्दन परकाळे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधिक्षक युवराज मालुसरे, विदयार्थी प्रतिनिधी समाधान इंगळे व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ अपर्णा कुचेकर,पर्यवेक्षक प्रा.राजकुमार इंगोले यांचेसह ज्युनियर व सिनीयर विभागातील सर्व शिक्षक व विद्यार्थी व विद्यार्थ्यीनी यांचेसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.











