ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन
पुणे (प्रतिनिधी )ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन झाले आहे. ते 72 वर्षांचे होते. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांना धक्का बसला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. समाज माध्यमांवर अनेक कलाकारांनी गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. बुधवारी रात्री त्यांची तब्येत खालवल्याचे वृत्तही समोर आले होते. बुधवारी रात्री उशीरा त्यांची प्रकृती खालवत गेली आणि उपचारादरम्यान रुग्णालयामध्ये त्यांचे निधन झाले. महाराष्ट्र सरकारच्या माहिती कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन विक्रम गोखलेंच्या निधनासंदर्भातील ट्वीट मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांनी करण्यात आलं आहे.विक्रम गोखले यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट मध्ये काम केले. तसेच छोटा पडदा व नाटकात देखील काम केले आहे. त्यांच्या अनेक भूमिका खूप गाजल्या. त्यांचे अनेक संवाद देखील गाजले.अभिनय साठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले.त्यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टी ची मोठी हानी झाली आहे.







