दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले अधिकारी, कर्मचारी यांचे स्मरणार्थ व भारतीय संविधान दिना निमित्त अकलूज पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबीर संपन्न
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज पोलीस ठाणे, अकलूज नगरपरिषद व दि आर्ट ऑफ लिव्हींग, अकलूज शाखा,आम्ही अकलूजकर यांचे संयुक्त विद्यमाने मुंबई येथील २६/११ रोजी दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले अधिकारी, कर्मचारी यांचे स्मरणार्थ व भारतीय संविधान दिना निमित्त अकलूज पोलीस ठाणे येथे शनिवार दि.२६/११/२२ रोजी रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर,अकलूज नगरपरिषद चे मुख्याधिकारी दयानंद गोरे,माजी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक विश्वास साळोखे, पोलिस उपनिरीक्षक बबन साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक सदाशिव जगताप, डॉ. वसुंधरा देवडीकर, पोलिस उपनिरीक्षक स्वाती कांबळे, इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. संतोष खडतरे, डॉ. बाहुबली दोशी आदी उपस्थित होते.
रक्तदान म्हणजे माणुसकी ची पूजा असून,आपले मानवी जीवन हे रक्तावरच अवलंबून असते.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या रक्तदान करण्यामुळे एखाद्या गरजूचे प्राण वाचू शकतात. या अनुषंगाने या शिबिरात सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यांचेसह 75जणांसह शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्रा.धनंजय देशमुख तर आभार माऊली मुंडफणे यांनी केले.
सदर शिबिरात अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक यांनी रक्त संकलन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी अधिकारी उदय साळुंखे, सत्यवान सुर्यवंशी ,चंद्रकांत पराडे,गोरख डांगे,विजय मिसाळ,विक्रम भोसले,विकास पाटील,मयुर माने,पिंटू भोसले यांनी सहकार्य केले.
चौकट :-
अकलूज पोलीस ठाणे, अकलूज नगरपरिषद व दि आर्ट ऑफ लिव्हींग, अकलूज शाखा यांचे संयुक्त विद्यमाने मुंबई येथील २६/११ रोजी दहशतवादी हल्यामध्ये शहीद झालेले अधिकारी, कर्मचारी यांचे स्मरणार्थ व भारतीय संविधान दिना निमित्त अकलूज पोलीस ठाणे येथे शनिवार दि.26/11/2022 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.रक्तदान म्हणजे माणुसकी ची पूजा असून आपले मानवी जीवन हे रक्तावरच अवलंबून असते.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या रक्तदान करण्यामुळे एखाद्या गरजूचे प्राण वाचू शकतात. या अनुषंगाने या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासत आज 55व्या वेळी रक्तदान केले..
गणेश लक्ष्मण जाधव.
नियमित रक्तदाता. अकलूज.



















