आ. राम सातपुते यांच्या प्रयत्नांना यश..माळशिरस मध्ये होणार भव्य ट्रामा केअर सेंटर
प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सर्वात शेवटचा तालुका म्हणून माळशिरस तालुक्याचा उल्लेख होतो याच तालुक्यातून 5 राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर असणाऱ्या व तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या माळशिरस मध्ये अपघातानंतर जखमींना तात्काळ सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी माळशिरसचे आ राम सातपुते यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना डॉ तानाजी सावंत यांना माळशिरस या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर व्हावे असे पत्र देऊन सतत पाठपुरवठा केल्याने माळशिरस मध्ये लवकरच सर्व सोयीने युक्त असे भव्य ट्रामा केअर सेंटर उभारले जाऊन अनेकांचे प्राण वाचणार आहेत आ. राम सातपुते यांनी दूरदृष्टी ठेवून केलेल्या प्रयत्नाला यश आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे . आ. राम सातपुते यांनी 14 सप्टेंबर रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना डॉ. तानाजी सावंत यांना पत्र दिले होते यामध्ये त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये मधून 5 राष्ट्रीय महामार्ग जात असून याच तालुक्यात 5 साखर कारखाने आहेत याचबरोबर माळशिरस हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी शासकीय कामानिमित्त लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून यामुळे वाहतूक व दळणवळणाच्या समस्या निर्माण होत आहेत या ठिकाणी असणारे ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र लोकसंख्येच्या मानाने सोयीसुविधा देण्यात अपुरे पडत असून याचा त्रास या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे अपघात झाल्यानंतर वेळेत प्राथमिक उपचार न मिळाल्याने अनेकांना आपले प्राणही गमवावे लागत आहेत यामुळे या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर होणे गरजेचे आहे असे पत्र दिले होते यावर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना डॉ तानाजीराव सावंत यांनी तात्काळ माळशिरस या ठिकाणी असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर व्हावे असे “अ” वर्गाचे आदेश पारित केल्याने माळशिरस मध्ये भव्य असे ट्रामा केअर सेंटर उभारले जाणार आहे
चौकट:-
माळशिरसच्या ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर होणार असल्याने अपघातानंतर, हृदयविकारानंतर किंवा इतर आजारांवर जखमींना तात्काळ सोयीसुविधा या ट्रामा केअर सेंटर मध्ये मिळाल्याने अनेकांचे प्राण तर वाचणार आहेतच पण याचबरोबर या ट्रामा केअर सेंटर मध्ये अस्थिरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, सर्जन, स्त्री रोग तज्ञ, भूलतज्ञ असे वेगवेगळे डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध झाल्याने सर्व प्रकारच्या जखमींवर उपचार होणार आहेत आप्पासाहेब देशमुख ,नगराध्यक्ष माळशिरस नगरपंचायत







