श्री गणपती फार्मसी महाविद्यालयाची मार्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट
मौजे अकोले खुर्द ता.माढा येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयातील डी फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी टेंभुर्णी येथील अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या मार्स मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल ला भेट दिली. हॉस्पिटल मध्ये विद्यार्थ्यांना विविध विभागाची तसेच उपकरणांची माहिती मिळाली जसे की डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी, आय सी यु विभाग, हॉस्पिटल फार्मसी, शस्त्रक्रिया विभाग, डेंटल विभाग, ऑक्सीजन प्लांट ऑपरेशन थेटर, सिटीस्कॅन विभाग, एम आर आय विभाग,इत्यादी गोष्टी प्रत्यक्ष पहायला व समजून घ्यायला मिळाल्या.येथे मिळालेल्या माहितीमुळे ज्ञानात भर पडल्याची प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी दिली. मार्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. शेंडगे, डॉ. कांबळे, डॉ. पाटील, डॉ.माने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी स्वतःचा व हॉस्पिटलचा आजपर्यंतचा प्रवास विशद केला जो मुलांना भविष्यात नक्कीच मार्गदर्शी राहील. रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबाबत व परवानगीबद्दल प्राचार्य डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी आभार व्यक्त केले. प्रा. मोनिका माळी यांनी हॉस्पिटल व्हिजिट चे समन्वयक म्हणून कार्य केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे, प्रा. केतकी पाटील, प्रा. कोमल यादव, प्रा. रूपाली राऊत, प्रा. दिव्या ओस्तवाल, प्रा. प्राची पुराणिक उपस्थित होते.







