अकलूज नगरपरिषदेच्या 3 कोटी 45 लाख रूपयांच्या विकासकामांचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील आणि आ. राम सातपुते यांच्या शुभहस्ते भूमीपूजन
अकलूज ( प्रतिनिधी )अकलूज नगरपरिषदेच्या वतीने परिसरातील विविध विकासकामांचे भूमीपूजन आज आ. रणजितसिंह मोहिते-पाटील व आ. राम सातपुते यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी भाजपा संघटन महामंत्री धैर्यशिल मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच , किशोरसिंह माने पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील,संग्रामनगर ग्रामपंचायत चे सरपंच कमाल शेख, ऍड. वजीर शेख,अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.भूमीपूजन संपन्न झालेल्या विविध विकास कामा मध्ये हिंदू स्मशानभूमी येथे तब्बल 1 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक गॅसदाहीनी उभारण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक, वेळेची व पैशाची बचत होणार्या या गॅस दाहिनीसाठी आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याचे यावेळी माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.याबरोबरच 25 लाख रूपये खर्चून मुस्लिम समाज दफनभूमी येथे बांधण्यात येणार्या संरक्षण भिंतीचे, रामायण चौक व शिवाजी चौक येथे 60 लाख रूपये खर्चून बांधण्यात येणार्या महिला व पुरूष यांचेकरिता सार्वजनिक शौचालयाचे, विजयनगर कॉलनी येथे 30 लाख रूपये खर्चून बांधण्यात येणार्या महिला व पुरूष यांच्याकरिता नवीन सार्वजनिक शौचालयाचे, महानुभव मठ येथे 20 लाख रूपये खर्चून बांधण्यात येणार्या महिला व पुरूष यांच्याकरिता नवीन सार्वजनिक शौचालयाचे, महर्षी कॉलनी 21 खोल्या शाळा पाठीमागे 30 लाख रूपयेचे बांधण्यात येणार्या महिला व पुरूष यांच्याकरिता नवीन सार्वजनिक शौचालयाचे, इंदिरानगर वसाहत क्रांतीसिंह घरकुल येथे 30 लाख रूपये चे बांधण्यात येणार्या महिला व पुरूष यांच्याकरिता नवीन सार्वजनिक शौचालयाचे, काझी गल्ली येथे 20 लाख रूपयेचे महिला व पुरूष यांच्याकरिता नवीन सार्वजनिक शौचालयाचे तसेच नामदेव मंगल कार्यालयासमोर 30 लाख रूपये चे महिला व पुरूष यांच्याकरिता नवीन सार्वजनिक शौचालय बांधकामाचे भूमीपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.























