आ. सातपुते यांनी केले वाघमोडे कुटूंबाचे सांत्वन.तिरवंडी येथील माणिकराव सोपान वाघमोडे यांचे दुःखद निधन.ऍड. राजाभाऊ वाघमोडे यांना पितृशोक
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील तिरवंडी येथील माणिकराव सोपान वाघमोडे (वय -77.)यांचे शुक्रवार दि.11नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.तिरवंडी येथील नामवंत वकील राजाभाऊ वाघमोडे यांचे ते वडील होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन भाऊ,चार मुले, सुना,चार नातू, सहा नाती असा असा मोठा परिवार आहे.ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान माळशिरस तालुक्याचे आ. राम सातपुते यांनी या दुःखद प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर वाघमोडे परिवार यांच्या घरी भेटून त्यांचे सांत्वन केले. व त्यांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर या कुटूंबाला या मोठया दुःखातून सावरण्याचे बळ देवो. अशी प्रार्थना केली.









